Join us

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 12:54 PM

राजधानी नवी दिल्लीत रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्याचे दिसत आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दुस-याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे.

मुंबई, दि. 4 - राजधानी नवी दिल्लीत रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्याचे दिसत आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दुस-याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, गजानन किर्तीकर यांच्यासह पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते येणार आहेत. याशिवाय, शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुखांनाही बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या तातडीनं बोलावण्यात आलेल्या बैठकीत नेमके काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

एनडीएचा झालाय मृत्यू- संजय राऊत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेसह एनडीएच्या घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेचा संताप अनावर झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची हत्या झाली आहे. तिचे अस्तित्व आता केवळ कागदावर उरले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला होता. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र 'केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचं सोडाच; साधी विचारणाही न झाल्यानं शिवसेना प्रचंड संतापली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात, एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठकांपुरती उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यूच झाला आहे,' अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिली.   

टॅग्स :भाजपाउद्धव ठाकरे