मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी घुमली म्हणत आज शिवसेनेने आज मुंबईत दादरा हवेलीनगर विजयाचे पोस्टर मुंबईत लावले आहेत. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दादरा पोटनिवडणुकीत प्रचंड विजय झाला. तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने कलाबेन डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचे खाते खोलले आहे. यामुळे कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर सेनेचा मुंबईत जल्लोष होत आहे.
या विजयानंतर कलाबेन डेलकरच्या विजयाने शिवसेनेने दिला भाजपला धक्का असे शिवसैनिक म्हणत आहेत. काल दादरा हवेली नगर पोटनिवडणुकीचा निकाल लागला. या विजयाचा जल्लोष मुंबईत शिवसेनेच्या बालेकिल्यात शिवसैनिक व शिवसेना नेत्यांनी केला. यानंतर आज मुंबईत ठिकठिकाणी या विजयाचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यात 'दादरा'त शिवसेनेचा हादरा, असा मजकूर लिहून विजयी उमेदवाराला शुभेच्छा देत भाजपला टोला लगावण्यात आला आहे.
दादरा-नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांनी मुंबई आत्महत्या केली होती. यावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठ राजकारण रंगले होते. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजप नेत्यांवरही आरोप झाले होते. यानतंर शिवसेने भाजपला आव्हान देत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना पोटनिवडणुकीत उतरवले. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला असून कलाबेन डेलकर यांचा विजय झाला आहे.