Join us  

मराठा समाजाला आरक्षण न देण्याची शिवसेनेची भूमिका - नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालणारा हा निर्णय असून, मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास हे तीन ...

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालणारा हा निर्णय असून, मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास हे तीन पक्षांचे सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी शिवसेनेची आधीपासूनच भूमिका आहे. मी शिवसेनेत अनेक वर्ष होतो त्यामुळे मला हे माहीत आहे. उद्धव ठाकरे यांना आरक्षणाविषयी काहीच माहिती नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मराठा समाजाला मोठा दुखद धक्का बसला आहे. मराठा समाजात मागासलेल्या लोकांना भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, त्याचवेळी संशय आला होता. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत ५२ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मात्र, मराठा आरक्षण रद्द करणे अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील लढा आजही संपलेला नाही. मराठा समाज लढा सुरूच ठेवणार आहे.

आपल्यावर अन्याय झाल्याची मराठा समाजाची भावना आहे. आमच्या समाजाला प्रगतीपासून वंचित ठेवणारा हा निर्णय आहे. इतर समाजाला आरक्षण मिळण्यात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. काहींना आता वाटेल मराठा समाज संपला. मात्र, मराठा समाज अजून जिवंत आहे, आम्ही हा लढा सुरू ठेवू. पण, काही लोकांचे खायचे आणि दाखविण्याचे दात वेगळे असतात, हे समाजाने आता लक्षात घ्यावे.

...................................