मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

By मनोहर कुंभेजकर | Published: November 28, 2022 04:10 PM2022-11-28T16:10:00+5:302022-11-28T16:10:46+5:30

झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव व खजिनदार पदाची निवडणूक घेण्यात आली. मुंबई जिल्हा उपनगर कौ. ऑप. हौसिंग फेडेरेशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या निवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी फटाके व गुलाल उधळत एकच जल्लोष केला. 

Shiv Sena's saffron in Mumbai District Suburban Federation elections, Abhishek Ghosalkar as President | मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

Next

मुंबई - मुंबई जिल्हा उपनगर को. ऑप. हौसिंग फेडेरेशन लिमिटेड सहकारी संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे. फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक विनोद घोसाळकर, सचिवपदी रमेश प्रभू तर खजिनदारपदी संजय  भोसले यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील राणा यांच्या अध्यासी अधिकारी याच्या उपस्थितीत संपन्न झाली. 

झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव व खजिनदार पदाची निवडणूक घेण्यात आली. मुंबई जिल्हा उपनगर कौ. ऑप. हौसिंग फेडेरेशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या निवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी फटाके व गुलाल उधळत एकच जल्लोष केला. 

मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील सुमारे 4 हजार 235 गृहनिर्माण संस्था या फेडरेशनच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आजचा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी सर्व सभासदांचे आभार मानत फेडरेशनच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थेच्या समस्या सोडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

गृहनिर्माण संस्था तक्रार निवार समिती वार्ड निह्यय स्थापन करून तक्रार निवारणाचे काम केले जाईल व गृहनिर्माण संस्था सभासदांच्या थकबाकीदार वसुलीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणूक करून लिगल सेलची स्थापना करणार असुन वसुली दाखला उपनिबंधकाकडून मिळवून त्याबद्दलची अमलबजावणी केली जाईल असे उपनगर जिल्हा फेडरेशनचे सचिव रमेश प्रभू यांनी सांगितले.

यावेळी मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशनचे सर्व संचालक संजय  भोसले- खजिनदार, पांडुरंग देसाई, अभिषेक  घोसाळकर , संदीप जाधव, जितेन  परमार,रमेश  प्रभू, स्मिता  चौधरी, अॅड.सुनीता गोडबोले, विशाल  कांबळे,उषा भोर,नंदकुमार वरणकर उपस्थित होते.
 

Web Title: Shiv Sena's saffron in Mumbai District Suburban Federation elections, Abhishek Ghosalkar as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.