ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद; अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल होताच भडकले, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 12:30 PM2022-09-11T12:30:27+5:302022-09-11T12:31:37+5:30

प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला.

Shiv Sena's Thackeray-Shinde Group Controversy; MP Arvind Sawant Arrive Dadar police station | ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद; अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल होताच भडकले, पाहा Video

ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद; अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल होताच भडकले, पाहा Video

googlenewsNext

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे गटात सुरु असलेल्या तणावाचं रुपांतर मारामारीत झाल्याचं दादरमध्ये पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गटाचे सरवणकर समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने वेळीच संघर्ष टळला. मात्र या वादाचे पडसाद पुन्हा उमटले आहेत. 

प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. 

सदर प्रकरणानंतर आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. पोलीस स्थानकांत दाखल होताच अरविंद सावंत आणि तेथील एका पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याची दिसून आली.  

दरम्यान, शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलाचा गैरवापर करून धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला असता. सत्तेचा माज किती झालाय हे या घटनांवरून दिसून येतेय असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी केला. 

एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात- संतोष तेलवणे

सदर प्रकरणाबाबत संतोष तेलवणे म्हणाले की, मी इमारतीखाली उभे असताना ५० जण माझ्यासमोर आले आणि माझ्याशी वाद घातला. मी एकटा त्यांना पुरेसा होतो. हात लावायचं तर ठार मारा, जिवंत ठेवला तर तुम्हाला एकेएकेला घरातून उचलून मारेन. आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पूर्वीची शिवसेना राहिला नाही. आधी १-२ जण मारायला जायचे आता एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जात आहोत असं त्यांनी म्हटलं. 

Web Title: Shiv Sena's Thackeray-Shinde Group Controversy; MP Arvind Sawant Arrive Dadar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.