आजची शांतता, उद्याचं वादळ...; गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:14 PM2023-01-11T18:14:58+5:302023-01-11T18:17:22+5:30

गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड झाले. शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले. एक ठाकरे गट तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट.

shiv senna A banner of Uddhav Thackeray's son Tejas Thackeray was put up at Girgaon in Mumbai and talk of him entering politics | आजची शांतता, उद्याचं वादळ...; गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

आजची शांतता, उद्याचं वादळ...; गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

Next

मुंबई- गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड झाले. शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले. एक ठाकरे गट तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट. आता खरी शिवसेना कोणाची यावरुन सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमिवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेसज ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आज मुंबईतील गिरगाव परिसरात तेजस ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Video: देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, नवनीत राणांनी जाहीर सभेतच सांगितलं

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी अजुनही राजकारणात प्रवेश केलेला नाही. तेजस ठाकरे हे गेल्या काही दिवसापासून वाईल्ड लाईफवर काम करत आहेत. दुलर्क्षित प्रजातींवर ते काम करत आहेत. पण, आता शिवसेनेच्या संकटाच्या काळात ते राजकारणात एन्ट्री करु शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आज मुंबईतील गिरगाव येथे तेजस ठाकरे यांचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवरील आशय हे राजकारणात एन्ट्रीचे आहेत."आजची शांतता, उद्याचे वादळ, नाव लक्षात ठेवा..तेजस बाळासाहेब ठाकरे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. 

मुंबई महानरपालिकेच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तेजस ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री होऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. 

शिवसेनेच्या मागिल काही कार्यक्रमातही तेजस ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळीही तेजस ठाकरे यांचा राजकारण प्रवेश होऊ शकतो असं बोलले जात होते. 

Web Title: shiv senna A banner of Uddhav Thackeray's son Tejas Thackeray was put up at Girgaon in Mumbai and talk of him entering politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.