सेल्फीसाठी लक्ष वेधतोय ‘शिवाजी पार्क पॉइंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:16 AM2018-05-07T07:16:00+5:302018-05-07T07:16:00+5:30
दादर येथील शिवाजी पार्क जवळील नारळी बागेचे सुशोभिकरण नुकतेच करण्यात आले आहे. या बागेत नुतनीकरण करताना अनेक नवनवीन कामे करण्यात आली आहेत. यात सर्वांचा आकर्षणाचा बिंदू म्हणून ‘शिवाजी पार्क पॉइंट’ ठरत आहे.
मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क जवळील नारळी बागेचे सुशोभिकरण नुकतेच करण्यात आले आहे. या बागेत नुतनीकरण करताना अनेक नवनवीन कामे करण्यात आली आहेत. यात सर्वांचा आकर्षणाचा बिंदू म्हणून ‘शिवाजी पार्क पॉइंट’ ठरत आहे. तरुणाई सेल्फीसाठी या पॉइंटवर सेल्फी काढताना दिसून येत आहे.
उन्हाळ््याची सुट्टी लागल्यामुळे नारळी बागेत लहान मुले आपल्या परिवारसह येत आहेत. येथे येऊन या जागेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. परिक्षा संपवून टेंशन दूर करण्यासाठी कॉलेजग्रुप येथे येऊन समुद्राचा आनंद निवांत घेतात. त्यानंतर या सेल्फी पॉईटकडे सेल्फी काढण्यासाठी वळतात. तरुणाई हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याला प्रचंड लाइक्स आणि कमेंट मिळत आहेत. सेल्फी पॉईट बनविण्याची संकल्पना अनेक दिवसापासून डोक्यात होती. मात्र कुठे बनवायचे हे मात्र निश्चित झाले नव्हते. दुसऱ्याला सेल्फी पॉइंटचा त्रास होणार याबाबत देखील विचार केला. त्यानंतर नारळी बागेची जागा सेल्फी पॉइंट उभारण्यासाठी उत्तम जाग असून येथे ‘शिवाजी पार्क पॉइंट’ बनविण्यात आला. ७ ते ८ महिन्यापासून या पॉइंटचे काम सुरु होते. नागरिकांची येथे गर्दी होत आहे. हेच आमच्यासाठी कामाची पोच पावती आहे, असे स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांनी सांगितले.
शाळेतील मुलांना उन्हाळ््याच्या सुट्टी लागली आहे. सर्वजण कुठे ना कुठे फिरण्याचे प्लॅन करत आहेत. यात कोणी लांब जाण्याचे प्लॅन करते तर कोणी एकच दिवस जाऊन येऊन करत आहेत. मात्र काहीचे विविध क्लास असल्यामुळे फिरायला, सेल्फी काढायला मिळत नाही. अशांनी नाराज न होता दादर येथील शिवाजी पार्क जवळील नारळी बागेतील पॉइंटला भेट द्या.