शिवाजी पार्क धूळमुक्त होणार

By admin | Published: February 28, 2016 02:13 AM2016-02-28T02:13:26+5:302016-02-28T02:13:26+5:30

शिवसेना-भाजपा या सत्ताधारी मित्रपक्षाच्या वादात पुन्हा एकदा मनसेने बाजी मारली आहे़ शिवसेनेच्या प्रतिष्ठेच्या वॉर्डावर कब्जा केल्यानंतर, रेन वॉटर हार्वेस्टिंगनंतर

Shivaji Park will be free of dust | शिवाजी पार्क धूळमुक्त होणार

शिवाजी पार्क धूळमुक्त होणार

Next

मुंबई : शिवसेना-भाजपा या सत्ताधारी मित्रपक्षाच्या वादात पुन्हा एकदा मनसेने बाजी मारली आहे़ शिवसेनेच्या प्रतिष्ठेच्या वॉर्डावर कब्जा केल्यानंतर, रेन वॉटर हार्वेस्टिंगनंतर दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क धूळमुक्त करण्याची मोहीम मनसेने शनिवारपासून हाती घेतली आहे़
शिवसेनेने २०१२ मध्ये पालिका निवडणुकीतील आपल्या वचननाम्यातून मुंबई धूळमुक्त करण्याचा निर्धार केला होता़ मात्र, गेल्या पाच वर्षांत त्या दिशेने एकही पाऊल शिवसेनेने टाकलेले नाही़ स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या मित्रपक्ष भाजपानेच अनेक प्रकल्प अडकवून ठेवल्यामुळे, शिवसेनेची कोंडी झाली आहे़ प्रकल्प पळापळवीवरून शिवसेना भाजपामध्ये श्रेयाचे राजकारण रंगले असताना, मनसेने मात्र सरशी करीत, आपले प्रकल्प मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे़
शिवाजी पार्कवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, पर्जन्यवृक्षांना नष्ट करणाऱ्या मिलीबग या किड्याला रोखण्यासाठीचा प्रयोगानंतर आता शिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी आज स्प्रिंगर्ल्स लावण्यात आले़ यामुळे पाण्याचा शिडकाव सतत शिवाजी पार्कसारख्या मोठ्या मैदानावर होत राहिल्याने, धूळ उडण्याचे प्रमाण आटोक्यात
येईल, असा विश्वास मनसेचे
गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Shivaji Park will be free of dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.