मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करणार आहे. या मैदानावर आता केवळ क्रिकेट नव्हे, तर जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुटबॉल, स्केटिंग अशा खेळांना प्रोत्साहन देणाºया सुविधा येथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाचा आराखडा तयार असून, यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबईतील सर्वात मोठ्या मैदानापैकी एक असलेल्या शिवाजी पार्कवर क्रिकेटसाठी आठ खेळपट्ट्या आहेत. नवीन आराखड्यानुसार क्रिकेटसाठी एक स्वतंत्र खेळपट्टी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे अन्य खेळांसाठी जास्त जागा उपलब्ध होईल. त्या ठिकाणी फुटबॉलसाठी उच्च दर्जाचे मैदान तयार करण्यात येणार आहे. समर्थ मंदिर येथे सध्या बास्केट बॉल खेळले जाते. या खेळासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या मैदानाच्या दक्षिणेकडे असलेल्या प्रवेशद्वाराकडे खो खो आणि कबड्डी या खेळासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मैदानातील उर्वरित ३१ टक्के जागा खुली ठेवण्यातयेणार आहे. त्यामुळे जागेत सामाजिक व राजकीय मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन सहज होऊ शकेल. यामध्ये दोन लाख लोक बसतील, एवढी जागा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कचे नवीन रूप सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.च्६८ हजार चौरस मीटर लॉनवर पाणी मारण्यासाठी १७ दशलक्ष लीटर पाण्याची गरज पडणार आहे. त्यामुळे दरवर्षी या मैदानावर पाणी मारण्यासाठी महापालिकेला २४ लाख रुपये खर्च येणार आहे.च्पाण्याची ही गरज भागविण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या शिवतीर्थ स्थानावर प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. आता रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मैदानावर पाण्याचा शिडकावा केला जाणार आहे.च्या मैदानावर क्रिकेट बरोबरच जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुटबॉल, बास्केट बॉल कोर्ट, स्केटिंग, खो खो आणि कबड्डी या खेळासाठी मैदानामध्ये जागा उपलब्ध करून सुविधा पुरविण्यात येणार आहेत.मैदानावर होणार पाण्याचा शिडकावाशिवाजी पार्कमध्ये धूळ अधिक असल्याने, त्यावर वेळोवेळी पाण्याचा शिडकावा करण्यासाठी महापालिका या ठिकाणी स्प्रिंगलर बसविणार आहे. अशा प्रकारचे राज्यातील हे पहिलेच स्प्रिंगलर ठरणार आहे. सध्या मैदानात पाण्याचा शिडकावा करणारे स्प्रिंगलर बंद पडले आहे.