शिवाजीराव नलावडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By admin | Published: September 11, 2015 01:53 AM2015-09-11T01:53:28+5:302015-09-11T01:53:28+5:30

प्रवीण दरेकरांनंतर आता शिवाजी नलावडे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाजी नलावडे यांनी गुरुवारी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुंबईच्या

Shivajirao Nalawade's entry into the NCP | शिवाजीराव नलावडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवाजीराव नलावडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next

मुंबई : प्रवीण दरेकरांनंतर आता शिवाजी नलावडे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाजी नलावडे यांनी गुरुवारी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुंबईच्या सहकार क्षेत्रातून मनसे जवळपास हद्दपार झाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या उपस्थितीत नलावडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेली १५ वर्षे मुंबई बँकेचे संचालक, राज्य सहकारी बँकेचे संचालक तसेच बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन पद सांभाळणाऱ्या शिवाजी नलावडे यांनी सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या पक्षांतराविषयी बोलताना नलावडे म्हणाले की, स्थापनेपासूनच मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. राष्ट्रवादीनेही मला भरभरून दिले. मात्र, मनसेच्या स्थापनेवेळी नेतृत्वाविषयी निर्माण झालेल्या गोड गैरसमजातून आपण मनसेत प्रवेश केला होता. पण लवकरच ती चूक असल्याचे लक्षात आले. गेल्या काही वर्षांपासून मनसेत घुसमट सुरू होती. त्यामुळेच मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या नेतृत्वात वाढलेला मी कार्यकर्ता आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नलावडे म्हणाले.
प्रवीण दरेकर आणि शिवाजी नलावडे यांच्यामुळे मुंबई सहकारी बँक व सहकाराच्या राजकारणात मनसेने वरचष्मा राखला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दरेकरांनी मनसेतून बाहेर पडत भाजपाचा रस्ता धरला आणि आता नलावडे यांनीही मनसेपासून फारकत घेतली.

Web Title: Shivajirao Nalawade's entry into the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.