शिवमंदिराचे शिल्प झाले जीर्ण
By admin | Published: August 21, 2014 11:21 PM2014-08-21T23:21:44+5:302014-08-21T23:21:44+5:30
भारतातील भूमीज शैलीतील अत्यंत प्राचीन अशा मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे अंबरनाथमधील शिवमंदिर. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही त्याच्या वैभवाची साक्ष देतात.
Next
पंकज पाटील - अंबरनाथ
भारतातील भूमीज शैलीतील अत्यंत प्राचीन अशा मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे अंबरनाथमधील शिवमंदिर. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही त्याच्या वैभवाची साक्ष देतात. मात्र, हेच शिल्प आता जीर्ण झाल्याने अंबरनाथचे हे
वैभव कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती येथील पुजा:यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पुरातत्त्व खात्याकडे तक्रार करूनही ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिलाहार राजा घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिराला 954 वर्षे पूर्ण झाली आहेत. शिल्पकलेचे वैभव असलेल्या या मंदिराकडे मात्र पुरातत्त्व खाते पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. शिल्पशास्त्रप्रमाणो शिवमंदिर हे सप्तांग भूमीज पद्धतीत मोडते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक अशा सात भूमी (शिल्परांगा) रचण्यात आल्या होत्या. त्यातील दुस:या आणि तिस:या रांगेतील शिल्प आता पूर्णत: ङिाजले आहे. शिल्पांचे दगडही ठिसूळ होत चालले आहेत. ऊन, वारा आणि पावसाचा परिणाम या मंदिरावर होत आहे. 2क् ते 25 ठिकाणी शिल्प धोकादायक झाले आहे. मंदिराची बांधणी ही शिल्पे रचून करण्यात आली असल्याने एखाद्या ठिकाणचे शिल्प ढासळल्यास मंदिराचा काही भाग कोसळण्याची भीती आहे.
या प्रकाराची कल्पना पुरातत्त्व खात्याला असतानाही त्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. मंदिराची जबाबदारी ज्या पुजारी कुटुंबीयांकडे आहे, त्यातील विजय पाटील यांनी मंदिराच्या धोकादायक शिल्पांची माहिती काढली. जी शिल्पे कोणत्याही क्षणी कोसळतील, त्यांच्या दुरुस्तीची मागणी त्यांनी केली.
मंदिरावरील अनेक दगडांनाही चिरा पडल्याने त्यातून पाणी ङिारपून हे मंदिर धोकादायक अवस्थेत आहे. लवकर या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन जे शिल्प आणि दगड ठिसूळ झालेत, त्यांची दुरुस्ती करत मंदिर वाचवण्याची मागणी केली आहे.