शिवदीप लांडे बनले उपमहानिरीक्षक; बिहार सरकारकडून मिळाली बढती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:40 AM2020-01-07T05:40:33+5:302020-01-07T05:40:42+5:30

गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतील अमलीपदार्थविरोधातील धडाकेबाज कारवाईमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांची उपमहानिरीक्षक म्हणून बढती झाली आहे.

Shivdeep Lande becomes Deputy Inspector General; Promotion from Bihar Government | शिवदीप लांडे बनले उपमहानिरीक्षक; बिहार सरकारकडून मिळाली बढती

शिवदीप लांडे बनले उपमहानिरीक्षक; बिहार सरकारकडून मिळाली बढती

Next

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतील अमलीपदार्थविरोधातील धडाकेबाज कारवाईमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांची उपमहानिरीक्षक म्हणून बढती झाली आहे. मूळ केडर असलेल्या बिहार सरकारकडून त्यांच्या पदोन्नतीचा आदेश सोमवारी काढण्यात आला. त्यांच्यावर आता कोणती जबाबदारी सोपविली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.
शिवदीप लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारस गावचे आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएसच्या २००६च्या तुकडीचे बिहार केडर मिळाले. त्या ठिकाणी गुन्हेगारी व अवेध धंद्यांविरोधात धडाकेबाज कारवाई केल्याने त्यांचा उल्लेख मराठी सिंघम म्हणून केला जात असे. लांडे हे २७ सप्टेंबर २०१७ मध्ये प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले आहेत. मुंबईच्या अंमलीपदार्थविरोधी पथकात (एएनसी) जानेवारी २०१७पासून उपायुक्त पदाची जबाबदारी सांभाळीत आहेत.

Web Title: Shivdeep Lande becomes Deputy Inspector General; Promotion from Bihar Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.