Join us

संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचे समन्स, मेधा सोमय्या मानहानी प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 7:32 AM

मीरा-भाईंदरमध्ये मेधा यांच्या अखत्यारित असलेल्या काही सार्वजनिक स्वच्छतागृहांचे बांधकाम आणि देखभालीमध्ये त्यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांचे पती तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केला होता.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवर स्थानिक न्यायालयाने गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत यांना समन्स बजावले. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना ४ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये मेधा यांच्या अखत्यारित असलेल्या काही सार्वजनिक स्वच्छतागृहांचे बांधकाम आणि देखभालीमध्ये त्यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांचे पती तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केला होता. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केली.

मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, त्यांच्यावर एफआयआर दाखल झालेला नव्हता. त्यानुसार मेधा यांनी न्यायालयाला विनंती केली की, राऊत यांना नोटीस जारी करावी आणि भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत मानहानीच्या आरोपांवर कारवाई सुरू करावी. शिवडी न्यायालयात १८ मे रोजी खटला दाखल करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. 

टॅग्स :संजय राऊत