शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड

By जयंत होवाळ | Published: December 17, 2023 08:37 PM2023-12-17T20:37:10+5:302023-12-17T20:37:38+5:30

शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व भागातील विद्यार्थ्यांना तसेच शिवडी पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ईस्टर्न फ्रीवेच्या खालून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा शाळेत तसेच फाटक ओलांड़ून प्रबोधनकार ठाकरे शाळेत जावे लागते.

Shivdi student's life-threatening journey, bus services stop by the municipality | शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड

शिवडीतील विद्यार्थ्याचा जीव मुठीत घेऊन प्रवास, पालिकेने बस सेवा बंद केल्याने परवड

मुंबई : शाळेत जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याची शिवडी भागातील शाळकरी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्थनिक शिवसेना शाखेने दिला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

शिवडी प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्व भागातील विद्यार्थ्यांना तसेच शिवडी पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ईस्टर्न फ्रीवेच्या खालून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा शाळेत तसेच फाटक ओलांड़ून प्रबोधनकार ठाकरे शाळेत जावे लागते. या ठिकाणी अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरु असते. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी २०१८ साली युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. 

ही मागणी,मान्य करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्यावतीने या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरु करण्यात अली. या सेवेचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत महापौर बंगल्याच्या ठिकाणी झाला होता. मात्र ऑगस्टपासून बस सेवा खंडित करण्यात आली, असे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले. यासंदर्भात सप्टेंबर महिन्यात पालिकेशी पत्रव्यवहार केल्यानंतर थोड्याच दिवसात बससेवा सुरु होईल, असे आश्वासन पालिकेने दिले .मात्र आजतागायत बससेवा सुरु झालेली नाही, याकडे पडवळ यांनी लक्ष वेधले.

हा विभाग प्रचंड रहदारीचा असून याच ठिकाणी शिवडी-न्हावा शेवा पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे ट्रॉलर ये-जा करत असतात. हा विभाग मुंबई बपोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत असल्याने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यन्वित नाही. भारत पेट्रोलियम तसेच अन्य पेट्रोलियम कंपन्या या भागात असल्याने मोठ्या प्रमाणवर टँकरची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो असे सांगतानाच थोड्याच दिवसात बससेवा सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पडवळ यांनी दिला.
 

Web Title: Shivdi student's life-threatening journey, bus services stop by the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.