शिवडी - वरळी उन्नतचा नारळ वाढणार; १०५१ काेटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 03:06 AM2020-11-08T03:06:02+5:302020-11-08T03:06:23+5:30

पुढील महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता

Shivdi - Worli Unnat coconut will grow; Expenditure of 1051 girls | शिवडी - वरळी उन्नतचा नारळ वाढणार; १०५१ काेटींचा खर्च

शिवडी - वरळी उन्नतचा नारळ वाढणार; १०५१ काेटींचा खर्च

Next

मुंबई : गेल्या आठ वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवडी - वरळी उन्नत मार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून, एमएमआरडीएने त्यांना नुकताच एओए (लेटर ऑफ असेप्टन्स) दिला आहे. या कामासाठी १०५१ कोटी रुपये खर्च होतील. 

शिवडी - न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पावरून येणाऱ्या वाहतुकीसाठी शिवडी - वरळी उन्नत मार्ग अत्यंत गरजेचा आहे. ट्रान्स हार्बर लिंक सुरू होण्यापूर्वी हा उन्नत मार्ग सुरू न झाल्यास परिसरात मोठी वाहतूककोंडी होईल. त्यानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात अनेक अडथळे निर्माण होतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काम तातडीने सुरू करण्याचे प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहेत.

साडेचार कि.मी. लांब आणि १७.२० मीटर रुंद असा हा शिवडी - वरळी उन्नत मार्ग असेल. ८ वर्षांपूर्वीच्या प्रकल्प अहवालानुसार बांधकामाचा खर्च ४९० कोटी तर, एकूण अंदाजित किंमत ५१७ कोटी होती. आता अंदाजे  बांधकाम खर्च १०५२ कोटी आणि अंदाजे किंमत १२७६ कोटी रुपये झाली आहे. ट्रान्सहार्बर लिंकसाठी एमएमआरडीएने सर्वप्रथम बीओटी तत्त्वावर निविदा काढल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिवडी - वरळी मार्गाचे कामही सुरू करता आले नव्हते.  २०१७ साली ट्रान्सहार्बर लिंकसाठी नव्याने सुरू झालेली निविदा प्रक्रिया यशस्वी झाली. ते काम प्रत्यक्षात सुरूही झाले. मात्र, शिवडी - वरळी मार्गाचे काम अधांतरीच होते. ते मार्गी लागले आहे. 

Web Title: Shivdi - Worli Unnat coconut will grow; Expenditure of 1051 girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.