महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तारखेनुसार) आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्सहाने साजरी होत आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील ट्विट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनने ट्विट करत म्हटले की, प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा करत शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सचिनने शुभेच्छा दिल्या आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंतीमहाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी केली जातो. तसेच जागतिक स्तरावर देखील शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते
दरम्यान क्रीडाविश्वातला ऑस्कर अशी लॉरियस पुरस्कारांची जगात ओळख आहे. त्याच लॉरियस पुरस्कारांचं सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये वितरण करण्यात आलं. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊन करण्यात आली. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील 20 दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे.