राज्य धर्मादाय आयुक्तपदी शिवकुमार डिगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:47 AM2017-08-18T05:47:34+5:302017-08-18T05:47:36+5:30

रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवकुमार डिगे यांची राज्य धर्मादाय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे़

Shivkumar Digage as the State Charity Commissioner | राज्य धर्मादाय आयुक्तपदी शिवकुमार डिगे

राज्य धर्मादाय आयुक्तपदी शिवकुमार डिगे

googlenewsNext

मुंबई : रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवकुमार डिगे यांची राज्य धर्मादाय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे़ मूळचे लातूर येथील न्या़ डिगे यांनी प्रारंभी जिल्हा न्यायाधीश म्हणून मुंबई येथील दिवाणी सत्र न्यायालयामध्ये काम पाहिले़ यादरम्यान ते सीबीआयचे विशेष न्यायाधीश म्हणूनही कार्यरत होते़ पुणे येथे सहधर्मादाय आयुक्त असताना त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन नावाने संस्था चालविणाºया शेकडो विश्वस्तांना त्यांच्या संस्थेच्या नावातील ‘भ्रष्टाचार’ हा शब्द वगळण्यास भाग पाडले.
न्या़ डिगे यांची पुणे येथील कारकिर्द बरीच गाजली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठाणला ७३ एकर जमीन कोराळी येथील संस्थेला परत देण्याचा आदेश दिला़ आदित्य बिर्ला हॉस्पिटलला गरीबांच्या उपचारासाठी १२ कोटी राखीव ठेवण्याचा आदेश दिला़ जेजुरी देवस्थानच्या पुजाºयांना देवाचे उत्पन्न घेण्यास मनाई हुकुम केला़ तारांकित हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार देण्याचे आदेशही दिले. भिकारीमुक्त पुणे अभियानांतर्गत अनेक संस्थांना एकत्रित करून बेघर मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले़ नाम फाऊंडेशनला एका दिवसात नोंदणी प्रमाणपत्र दिले होते़

Web Title: Shivkumar Digage as the State Charity Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.