- कुलदीप घायवटमुंबई : मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असली, तरी महसुलात घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी शिवनेरीच्या महसुलात तब्बल १५ लाख रुपयांची घट झाली आहे.राज्य परिवहन महामंडळाने मुंबई ते पुणे मार्गावर धावणाºया शिवनेरीचे तिकीट दर ८० ते १०० रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे या सेवेचे तब्बल ६० हजार प्रवासी वाढले. ८ जुलैपासून शिवनेरीची भाडेकपात करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक दिवसाला तीन ते चार हजार प्रवासी वाढले.मुंबई ते पुणे शिवनेरीमुळे जुलै ते सप्टेंबर, २०१८ या कालावधीत एसटीच्या तिजोरीत १७ कोटी ७२ लाख जमा झाले. मात्र, जुलै ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत एसटीच्या तिजोरीत १७ कोटी ५७ लाख जमा झाले. त्यामुळे या वर्षी ६० हजार प्रवासी वाढले. मात्र, १५ लाख रुपयांची घट झाली.
शिवनेरीचे प्रवासी वाढले, पण महसुलात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 5:54 AM