Join us  

शिवसैनिकांकडून विक्रोळीत मनसैनिकांवर हल्ला

By admin | Published: October 14, 2014 12:44 AM

निवडणूक प्रचाराची मुदत संपायला काही तास शिल्लक असताना विक्रोळीत शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यावर हल्ला केला.

मुंबई : निवडणूक प्रचाराची मुदत संपायला काही तास शिल्लक असताना विक्रोळीत शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यावर हल्ला केला. यापैकी एक मनसेचा कार्यकर्ता जबर जखमी असून, त्याच्यावर विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
या मतदारसंघातून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू सुनील रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपल्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीची माहिती प्रतिज्ञापत्रतून जाहीर केली. त्यानुसार त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, खंडणी उकळणो, धमक्या देणो, फसवणूक करणो असे गुन्हे दाखल आहेत. संबंधित न्यायालयाने या गुन्ह्यांची दखल घेतली आहे. 
राऊत यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी विक्रोळीतील अन्य प्रतिस्पध्र्याकडून प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांच्याकडून दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रची प्रत मनसेकडून मतदारसंघात वाटण्यात आली. शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्याआधी हे वाचा, असा संदेश या प्रतींवर प्रसिद्ध करण्यात आला होता. ही माहिती मिळताच शिवसैनिक या प्रतींचे वाटप करणा:यांना शोधू लागले. 
दुपारी शिवसैनिकांनी कांजूरमार्ग आणि विक्रोळीत संदीप शिरसेकर, योगेश चव्हाण यांच्यासह आणखी काही मनसे कार्यकत्र्याना शिवसैनिकांनी गाठले आणि बेदम मारहाण केली. यापैकी शिरसेकर यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. शिरसेकर यांच्या शरिरावर बांबूचे घाव घालण्यात आल्याचे फुले रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी विक्रोळी व कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात मनसैनिकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यांच्या तक्रारींवर रात्री उशिरार्पयत चौकशी व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांमध्ये आजी-माजी शिवसेना शाखाप्रमुखांसह गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले शिवसैनिक सहभागी होते. त्यांची नावे पोलिसांना मिळाल्याचेही समजते.
 
गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा प्रचार येथेही
घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम कदम हेही गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असल्याने त्यांच्याही प्रतिस्पध्र्यानी हा मुद्दा प्रचारात अग्रभागी घेतला. कदम यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी, मारहाण, जिवे मारण्याची धमकी, सरकारी कामात अडथळे अशा गुन्ह्यांसह आचारसंहिता भंगाचेही दोन गुन्हे दाखल झाले आहेत. भांडुप मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांच्याविरोधातही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असून, त्यांच्याही प्रतिस्पध्र्यानी हा मुद्दा प्रचारात घेतला होता.