वाढीव पाणीपट्टीविरोधात पनवेलमध्ये शिवसेना आक्रमक

By admin | Published: March 27, 2015 10:50 PM2015-03-27T22:50:49+5:302015-03-27T22:50:49+5:30

नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये पाणीपट्टी करात तब्बल ४५० प्रति कनेक्शनमागे एवढी एकदम वाढ केल्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.

Shivsena aggressor in Panvel against increased waterpelt | वाढीव पाणीपट्टीविरोधात पनवेलमध्ये शिवसेना आक्रमक

वाढीव पाणीपट्टीविरोधात पनवेलमध्ये शिवसेना आक्रमक

Next

पनवेल : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये पाणीपट्टी करात तब्बल ४५० प्रति कनेक्शनमागे एवढी एकदम वाढ केल्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, अथवा कमी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
नगराध्यक्षा चारुशीला घरत व बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे यांची शिवसेना नगरसेवक प्रथमेश सोमण व उपविभागप्रमुख मंदार काणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पनवेल नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये पाणीपट्टी करात तब्बल ४५० प्रति कनेक्शनमागे एवढी एकदम वाढ केल्याचा निषेध करुन ही वाढ अन्यायकारक व चुकीची असून ती ताबडतोब रद्द अथवा कमी करा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीकडून दरवर्षी फेबु्रवारी महिन्यानंतर (गाढेश्वर धरणातील पाणीसाठा संपल्यानंतर) पाणी विकत घेऊन पनवेल शहराला पुरवावे लागते. त्या पाण्याचा होणारा खर्च व मिळणारा कर यामधील तफावतीमुळे मोठी वित्तीय तूट तयार होत आहे व त्यासाठीच हा बोजा नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांवर टाकत आहे.
पनवेल तालुक्यात असलेली दोन धरणे यामधून पनवेल शहराला पाणी मिळावे यासाठी कोणतेही प्रयत्न नगरपरिषद प्रशासन करताना दिसत नाही. तालुक्यातील मोरबे धरण पनवेलच्याच भूमीत असून व त्याच्या सर्व वाहिन्या पनवेल परिसरातून जात असतानादेखील या धरणाचे पाणी पनवेलकरांना न मिळता नवी मुंबई महापालिकेकडे जात आहे. तरी सदर धरणाचे पाणी प्रथम पनवेलकरांना मिळावे व त्यानंतर ते पुढे नेण्यात यावे यासंदर्भात कोणताही पाठपुरावा नगरपालिका प्रशासन करत नाही.
पाणीपट्टी भरुनसुद्धा वेळच्यावेळी पाणी मिळेल याचा भरवसा नसल्याने सदर वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, अथवा कमी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी केली आहे. (वार्ताहर)

मुख्य जलवाहिनीची तोडफोड
४रोहा : कोलाड-रोहा महामार्गावरील वरसे हद्दीत रस्ताकडेने साळाव, रोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एका मुख्य जलवाहिनीची कुणा संबंधिताने तोडफोड केल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी पाणी चोरी ही न.पा. साठी मोठी डोकेदुखी होती. मध्यंतरी धाटावमधील एका व्यक्तीवर न. पा. च्या जलवाहिनीवरुन पाणी चोरी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. आता वरसे हद्दीतील मुख्य रस्त्यावरील जलवाहिनी तोडण्यात आली आहे. जलवाहिनी गळती ही अनेकदा मानवनिर्मिती असल्याचे यावेळी उघडकीस आले आहे.

Web Title: Shivsena aggressor in Panvel against increased waterpelt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.