बदलापुरात शिवसेनेचा जल्लोष!

By Admin | Published: April 24, 2015 03:52 AM2015-04-24T03:52:29+5:302015-04-24T03:52:29+5:30

विजयाची नशा काय असते, ते आज बदलापुरातील शिवसैनिकांनी दाखवून दिले. त्यांनी केलेल्या फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाच्यी उधळणीने शहरातील

Shivsena celebrate change! | बदलापुरात शिवसेनेचा जल्लोष!

बदलापुरात शिवसेनेचा जल्लोष!

googlenewsNext

बदलापूर : विजयाची नशा काय असते, ते आज बदलापुरातील शिवसैनिकांनी दाखवून दिले. त्यांनी केलेल्या फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाच्यी उधळणीने शहरातील सर्व रस्ते अक्षरश: न्हाऊन निघाले. एकहाती आलेल्या सत्तेमुळे शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला. या जल्लोषामध्ये महिला आघाडीचा उत्साह विशेष होता.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकहाती सत्ता खेचून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. भाजपानेदेखील जोरदार मुसंडी मारून २० जागा पटकावल्या आहेत. राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले असून एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही. ४७ सदस्य असलेल्या पालिकेत २४ जागा जिंकून शिवसेनेने सत्ता कायम राखली आहे. विजयानंतर बदलापुरात शिवसेनेचा जल्लोष दिसत होता.
पश्चिमेकडील भागात भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यावर कात्रप, शिरगाव, गांधी चौक, बेलवली, बदलापूर गाव, रमेशवाडी येथून शिवसेनेचे उमेदवार एकगठ्ठा निवडून आल्याने पहिल्यांदाच दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या भाजपाला २० जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे हेच आता नगराध्यक्षपदाचे मुख्य दावेदार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Shivsena celebrate change!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.