Join us

शिवसेनेचे नगरसेवक खंडणीखोर, दलाल

By admin | Published: February 12, 2017 3:40 AM

ठाणे महापालिकेची सत्ता हाती असलेल्यांनी तिला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजल्याने नगरसेवक खंडणीखोर आणि दलाल झाले. ठाण्यातील या नगरसेवकांचा बंदोबस्त

दिवा : ठाणे महापालिकेची सत्ता हाती असलेल्यांनी तिला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजल्याने नगरसेवक खंडणीखोर आणि दलाल झाले. ठाण्यातील या नगरसेवकांचा बंदोबस्त करण्यासाठीच मी आयुक्तपदी संजीव जयस्वाल यांना पाठवले. अशा खंडणीखोरांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश मीच आयुक्तांना दिले आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर हल्लाबोल केला.ठाणे महापालिकेच्या प्रचाराचा नारळ भाजपाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी दिवा येथे फोडला. या वेळी ‘विजय संकल्प सभा’ पार पडली. याप्रसंगी भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, भाजपा नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, भाजपा नेते जगन्नाथ पाटील, महिला आघाडीप्रमुख माधवी नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तुम्ही ज्यांच्या हाती सत्ता दिली, त्यांच्या नाकर्तेपणामुळे दिव्याचा विकास झाला नाही. ठाण्यातील रिअल इस्टेटमध्ये सत्ताधारी पक्षाला व नेत्यांना पैसा दिसतो. दिव्यात पैसा नाही, म्हणून दिव्याचा विकास झाला नाही. (प्रतिनिधी)रेल्वे स्थानकावर गाजरांचे वाटपमुख्यमंत्री फडणवीस कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी आले, तेव्हा त्यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामधील एक छदामही मिळालेला नाही. शनिवारी फडणवीस यांनी दिव्यात येऊन दिवा दत्तक घेण्यासह अनेक आश्वासने जाहीर सभेत दिली. लागलीच शिवसेनेचे उमेदवार रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्र्यांची सभा संपताच दिवा रेल्वे स्थानकावर गाजरांचे वाटप करून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासने देऊन ती न पाळण्याचा अभिनव पद्धतीचा निषेध केला.पालकमंत्री बदलण्याची मागणी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अकार्यक्षम आहे. त्यांना जास्तीच्या खात्याचा भार पेलवत नाही. त्यांच्याऐवजी चांगला पालकमंत्री द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी केली, तर आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाने केवळ टेंडरिंग आणि टक्केवारी वाटून घेण्यात धन्यता मानली, असा आरोप केला.एका वर्षात दिव्यातील डम्पिंग ग्राउंड हटवूदिव्यातील मतदारांनी भाजपाचे १० नगरसेवक निवडून दिल्यास एक वर्षाच्या आत दिव्यातील डम्पिंग ग्राउंड हटवून ते ठाण्यातील नियोजित जागी नेण्यात येईल. सत्ताधारी शिवसेना डम्पिंग ग्राउंड ठाण्यात हलवू देत नाही. दिव्यातील नागरिकांची डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून मुक्तता करून ठाण्यात शस्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास महापालिकेस भाग पाडू.२० दशलक्ष लीटर पाणीदिव्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून दिव्याला २० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करणारा प्रकल्प उभारू. त्यामुळे दिवा परिसरातील सांडपाण्याची समस्या सुटेल आणि दिव्याला पाणीदेखील मिळेल. ठाण्यातील कचरा आणि सांडपाणी दिव्यात टाकण्याचे काम ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. एमएमआरडीए दिवा घेणार दत्तकएमएमआरडीएच्या माध्यमातून दिव्याचा विकास करण्यासाठी दिवा दत्तक घेऊन दिव्याचा संपूर्ण विकास करण्यात येईल.बेकायदा बांधकामांची शास्ती करू रद्ददिव्यातील बेकायदा बांधकामांना लागू केलेली शास्ती रद्द करून बांधकामे नियमित केली जातील. मात्र, बेकायदा बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना जेलमध्ये टाकू.तृतीयपंथीयाचा घुसखोरीचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांना स्थानिक उमेदवारांनी गदा भेट दिली. त्यांनी ती उंचावून गरागरा फिरवली. त्याच वेळी एका तृतीयपंथीयाने सभेसमोर येऊन बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कार्यकर्त्यांनी मागे खेचले.