मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर सुरुवात झाली आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला मित्रपक्ष भाजपासोबत ताणलेले संबंध, आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा, राफेल विमान करार अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दसरा मेळावा अपडेट
- २०१९ च्या निवडणुकीत काय होणार असं विचारलं जातंय, पण काय होणार असं विचारू नका आम्ही हे करणार असं ठरवा - उद्धव ठाकरे
- मी टू प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला फासावर लटकवा - उद्धव ठाकरे
- पाच राज्यांत निवडणुका जिंकल्या तर महागाई कमी करू, पेट्रोलचे दर कमी करू, असे आश्वासन द्या, मीसुद्धा तुमच्यासोबत प्रचार करेन - उद्धव ठाकरे
- आता देशातील सर्व प्रश्न बाजूला ठेवून देशाचे प्रधानसेवक आणि त्यांचे अन्य सेवक पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा प्रचार करत फिरणार - उद्धव ठाकरे
- अन्यथा राम मंदिर बांधण्याचे आश्वासन हा जुमला असल्याचे जाहीर करा
- सरकार राम मंदिर बांधणार नसेल, तर ते आम्हाला बांधावे लागेल - उद्धव ठाकरे
- २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
- भूगोलाच्या पुस्तकात वाचले नसतील, असे देश मोदींमुळे कळले - उद्धव ठाकरे
- कलम ३७० रद्द करण्यासाठी संसदेत विधेयक आणा, शिवसेना सर्व वाद विसरून पाठिंबा देऊ - उद्धव ठाकरे
- भारताचे राष्ट्रपतीसुद्धा काश्मीरमध्ये एक इंचसुद्धा जागा घेऊ शकत नाही - उद्धव ठाकरे
- विष्णूचा अकरावा अवतार भाजपासोबत, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
- रमजान असलं की युद्धबंदी होते, मग नवरात्रीत का नाही? आमचे सण असले की आवाज बंद का - उद्धव ठाकरे
- डॉलरचा भाव वाढत आहे - उद्धव ठाकरे
- खुर्चीवर बसून अनेक मोठे झाले, माणूस मनाने मोठा असावा - उद्धव ठाकरे
- २०१४ चे वातावरण आता नाही, हवा बदलली आहे - उद्धव ठाकरे
- अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध निर्माण झाले होते - उद्धव ठाकरे
- दुष्काळ जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरू - उद्धव ठाकरे
- केंद्र आणि राज्यात सरकार असूनही राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची धमक सरकार दाखवू शकलेले नाही - उद्धव ठाकरे
- कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला, पण महाराष्ट्र सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही - उद्धव ठाकरे
- सोसायटीच्या निवडणुकांकडेही भाजपाचे लक्ष - उद्धव ठाकरे
- राज्य दुष्काळाने होरपळतेय - उद्धव ठाकरे
- देशाच्या राशीत वक्री झालेले शनी आणि मंगळ - उद्धव ठाकरे
- जो प्रश्न शिवसेनेला विचारला जातो, तोच संघाला विचारला जात नाही - उद्धव ठाकरे
- सरकारविरोधी मत मांडणे म्हणजे देशद्रोही का - उद्धव ठाकरे
- भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे - उद्धव ठाकरे
- धनुष्यबाण आमचाच म्हणतात, पण धनुष्यबाण हा मर्द शिवसैनिकांच्याच हाती शोभतो -उद्धव ठाकरे
- रावण उभाच आहे, पण राम मंदिर उभारले जात नाही
- आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करू नका - उद्धव ठाकरे
- देशातला हिंदू जागा आहे, हे विसरू नका - उद्धव ठाकरे
- प्रभू रामचंद्रांची मुर्ती उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आले. मंत्री रामदास कदम यांच्या कार्य अहवालाचे उद्धव यांच्या हस्ते प्रकाशन
- उद्धव ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर आगमन. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. सोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे
- पुढच्या सहा महिन्यात मंत्रालयात साचलेला कचराही वाहून जाईल. अाता आपली वेळ सुरू झाली आहे. आमचा स्वबळाचाच कारभार सुरू आहे. २०१९ ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आता काही झाले तरी शिवसेना सोबत हवी, यासाठी धडपड सुरू आहे. - संजय राऊत
- चार वर्षांपुर्वी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याच आश्वासन देणाऱ्या भाजपाने जनतेची घोर फसवणूक केली. इंधनावरील करापोटी दरवर्षी सहा लाख कोटी तिजोरीत जाते. पेट्राॅल कंपन्या दरवर्षी ५३ हजार कोटींचा नफा कमावतात - सुभाष देसाई