Join us

Deepali Sayed : "वाढती महागाई, दरवाढ आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 4:39 PM

Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. भाजपाने काढलेल्या मोर्च्यात बोलताना चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर तीव्र शब्दांत टीका केली होती. "कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या" असे म्हणाले होते. याला आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. 

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मोदींनी मसनात जा, शहांनी मसनात जा, वाढती महागाई, दरवाढ आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या" असं दीपाली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही पाटलांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात बॅनरबाजी करून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.   

पुण्यामध्ये एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? असा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात आलेला आहे. तर पुढे हॅश टॅग चंपावाणी असा जाहीर निषेध बॅनर लावून सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा साई चौक सुस रोड, पाषाण येथे जाहीर निषेध करण्यात आला. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला जात आहे. पुण्यातही रुपाली पाटील यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. तर सदानंद सुळे यांनी सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यायवर ट्विट केले आहे. या सर्व घडामोडीत पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बॅनरबाजी दिसून आली आहे. पुण्यात पाषाण सुस रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत.  

टॅग्स :दीपाली सय्यदचंद्रकांत पाटीलभाजपाशिवसेनासुप्रिया सुळे