Shivsena: दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:30 PM2022-06-24T17:30:06+5:302022-06-24T18:10:14+5:30

शिवसेनेनं एकीकडे कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असताना आमदार दिलीप लांडे हेही एकनाथ शिंदेच्या गटात सामिल होत आहेत

Shivsena: Dilip Lande made Shiv Sena's 'mama', MNS told the history of Fodafodi | Shivsena: दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास

Shivsena: दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास

googlenewsNext

मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व विचारांशी तडजोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला. शिंदे गटात शिवसेनेचे खंदे शिलेदार एक-एक करुन सामिल होत आहेत. गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, दादा भुसे यांच्यासारखे कट्टर शिवसैनिक शिंदे गटाला मिळाले आहेत. त्यामुळे, शिंदे गटाची ताकद वाढली असून आता आमदार दिलीप लांडे हेही शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यावरुन, मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे.   
 
शिवसेनेनं एकीकडे कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असताना आमदार दिलीप लांडे हेही एकनाथ शिंदेच्या गटात सामिल होत आहेत. आमदार दिलीप लांडे हे आज सकाळी गुवाहटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लू येथे दाखल झाले. यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला. त्यानंतर, कधीकाळी मनसेचे नगरसेवक असलेल्या आणि नगरसेवकांचा गट घेऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप लांडेंचे पक्षांतर पाहून मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे. मनसेच्या अमेय खोपकर यांनी ट्विट करत, मौका सभी को मिलता है... असे म्हटले आहे. 

दिलीप लांडेने शिवसेनेचा ‘मामा’ केला. विधानसभा निवडणुकीत फक्त चारशे मतांनी जिंकलेला हा लांडे पळवापळवी करण्यासाठी प्रसिद्ध आहेच. एकेकाळी आम्हाला हसणाऱ्यांना आता आमच्या वेदना कळल्या असतील. मौका सभी को मिलता है... असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. खोपकर यांनी एकप्रकारे मनसेसोबत घडलेल्या पक्षांतराची आठवणच शिवसेनेला करुन दिली. 

दिलीप लाडेंनी घेतली गळाभेट

दिलीप लांडे यांनी हात उंचावतच त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, तिथं उपस्थित शिवसेनेच्या आमदारांना जादू की झप्पी दिली. गळाभेट, हस्तांदोलन आणि फोटोसेशनही केलं. विशेष म्हणजे आदल्यादिवशीच लांडे यांनी मी कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. ''मी महाराष्ट्रातच आहे, उद्धव ठाकरेंसोबत सुखी आहे, उद्धव ठाकरेंसोबतच राहणार'' असल्याचं लांडे यांनी म्हटलं होतं. माझ्या गुवाहटीत जाण्याबद्दलच्या बातम्या केवळ तुम्हीच पसरवत आहात, पण मी इथेच आहे, असे लांडे यांनी म्हटलं होतं. मात्र, आज ते शिंदे गटात सामिल झाले आहेत. दरम्यान, दिलीप लांडे चांदिवली मतदारसंघाचे आमदार आहेत. 

कोण आहेत दिलीप लांडे

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत 13 ऑक्टोबर 2017 शिवसेनेते गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं होतं. या नगरसेवकांचं नेतृत्त्व दिलीप लांडे यांनी केलं होतं. त्यामुळे, शिवसेनेनं दिलीप लांडे यांनी विधानसभेला तिकीट देऊन आमदारकीची जबाबदारी दिली. आता, तेच लांडे एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत.

Web Title: Shivsena: Dilip Lande made Shiv Sena's 'mama', MNS told the history of Fodafodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.