Shivsena: गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:23 PM2022-06-27T13:23:09+5:302022-06-27T13:23:31+5:30

गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा खातं हे आता अनिल पुरवठा यांच्याकडे देण्यात आलं आहे. 

Shivsena: Give a push to Gulabrao Patil, to Anil Parban, water supply department in the cabinet | Shivsena: गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे

Shivsena: गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे

Next

मुंबई - जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिवसेनेतील अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामध्ये, गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा खातं हे आता अनिल पुरवठा यांच्याकडे देण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे त्याप्रमाणे गुवाहटतील मंत्र्यांकडे असेलली खाती आता इतर मंत्र्यांना देण्यात आली आहेत. 

पाणीपुरवठा खात अनिल परब यांच्याकडे

शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर असलेल्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेलं पाणीपुरवठा हे खातं आता मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे, पाटील यांच्यावर पक्षाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात सहभाग घेतल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली. एका पानपट्टीवाल्याला शिवसेनेनं मंत्री केलं, आता त्यांना पुन्हा पानपट्टीवर बसवणार, असं राऊत म्हणाले होते. त्यानंतर, आता शिवसेनेनं गुलाबराव पाटील यांना धक्का दिला आहे. 

जळगावात संजय राऊतांविरुद्ध संताप

राज्यातील सत्तासंघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेच्या नेत्यांकडून बंडखोरांवर कठोर टीका केल्या जात आहेत. त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केल्याने गुलाबराव पाटलांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोमवारी गुलाबरावांच्या पाळधी गावी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल 

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात  बदल

शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात)  आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण
 

Web Title: Shivsena: Give a push to Gulabrao Patil, to Anil Parban, water supply department in the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.