शिवसेनेला देव सुबुद्धी देवो - प्रकाश जावडेकर

By admin | Published: October 1, 2014 01:13 AM2014-10-01T01:13:47+5:302014-10-01T01:13:47+5:30

शिवसेनेचा निशाणा चुकत असून जिंकणा:या पक्षावरच टीका होत़े आम्ही एक चांगला कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जात आहोत़ पण, जे लोक टीका करत आहेत,

Shivsena God Divine Devo - Prakash Javadekar | शिवसेनेला देव सुबुद्धी देवो - प्रकाश जावडेकर

शिवसेनेला देव सुबुद्धी देवो - प्रकाश जावडेकर

Next
>ठाणो : शिवसेनेचा निशाणा चुकत असून जिंकणा:या पक्षावरच टीका होत़े आम्ही एक चांगला कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जात आहोत़ पण, जे लोक टीका करत आहेत, त्यांना देव सुबुद्धी देवो, असा टोला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाण्यात शिवसेनेला हाणला़
शहरातील भाजपा उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होत़े शिवसेना प्रचारसभांमध्ये भाजपाला  लक्ष्य करीत आहे, असा सवाल केला असता वरील शब्दांत त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला़ काँग्रेस-राष्ट्रवादीवरही त्यांनी कडाडून टीका केली़ हे पक्ष आता वेगळे झाल्याने कोणी किती फायली उघडल्या आणि कोणी किती बंद केल्या, याचे दोष ते एकमेकांना देत आहेत़ मात्र, या दोघांनी महाराष्ट्राला लुटण्याचेच पाप केले असून त्यांची त्यातून मुक्तता नाही, असे ते म्हणाल़े
या निवडणुकीत आमची लढत दु:शासनाबरोबर आहे. लोक विचार करून मतदान करतात़ आमची मते  विभागली जाणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. ही निवडणूक म्हणजे राजकारणाचा धंदा करणारे विरुद्ध त्यांची सेवा करणारे अशी असल्याचेही ते म्हणाल़े  3क् ते 35 वर्षे राज्यात युती आणि आघाडी यांचे राज्य होते. पण, आता महाराष्ट्राच्या राजकारणाने कूस बदलली आह़े आता महाराष्ट्र राष्ट्र के साथ असेल, असा दावाही त्यांनी केला. तसेच ठाणो आणि कळवा येथील उमेदवारी नाटय़ संपल्याचे सांगून यंदा सीमोल्लंघन नक्की होईल. महायुतीत जे रिपाइं, स्वाभिमानी, रासपा आणि शिवसंग्राम हे पक्ष होते, ते आजही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे ही महायुतीच असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. या वेळी उमेदवार संजय केळकर, अशोक भोईर आणि संदीप लेले उपस्थित होत़े  (प्रतिनिधी) 

Web Title: Shivsena God Divine Devo - Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.