Shivsena: गुवाहटीत असली, 'वर्षा'वर नकली अन् सेक्युलर गॅसवर; मनसेनं पुन्हा डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:56 AM2022-06-22T08:56:32+5:302022-06-22T09:00:07+5:30
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून कोणाचेही नाव न घेता त्यांनी हे ट्वीट केलं आहे.
मुंबई - राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या दाव्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. मनसेचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून कोणाचेही नाव न घेता त्यांनी हे ट्वीट केलं आहे. असली गुवाहटीत आणि नकली 'वर्षा'वर आणि सेक्युलर गॅसवर, असे म्हणत गुवाहटीत असलेले एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. या ट्विटमधून त्यांनी राष्ट्रवादी अन् काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर, वर्षा बंगल्यावर असलेले मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नकली असल्याचे त्यांनी सुचवलं आहे. देशपांडे यांनी यापूर्वीही मंगळवारीही मुख्यमंत्री यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. '21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस की, वर्षा बंगल्यातील शेवटचा दिवस' असं ट्वीट करत शिवसेनेतील बंडाळीवर भाष्य केलं होतं.
असली गुहाटीत नकली "वर्षा" वर आणि सेक्युलर गॅस वर
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 22, 2022
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. पण, एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, एकनाथ शिंदे अजूनही भाजपासोबत सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
#WATCH Gujarat | Shiv Sena's Eknath Shinde seen with party MLAs at a Surat hotel, yesterday, June 21
As of now, Shinde, as per his claim, is with at least 40 MLAs who are camping in Guwahati, Assam pic.twitter.com/yvYI4rXbhJ— ANI (@ANI) June 22, 2022
बाळासाहेबांचं हिंदुत्त्व आम्ही पुढे नेतोय
आसाममध्ये दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. "बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील. माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत आणि आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.