"मुंबईत शिवसेना नसली तरी आम्ही सुरक्षित राहू शकतो असं ज्यांना वाटतं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 12:40 PM2022-08-13T12:40:42+5:302022-08-13T12:41:15+5:30
मुंबई, महाराष्ट्रात हायहॉल्टेज ड्रामा लोकं पाहत आहे. बाळासाहेबांचे घर फोडण्याचं काम होतेय ते लोकांना आवडत नाही असं माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई - लोकांमध्ये प्रचंड खदखद आहेत. लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून नागरिक जो निर्णय देतील तो मान्य आहे. मुंबईत शिवसेना नसली तरी आम्ही सुरक्षित राहू शकतो असं वाटत असेल लोक त्यांना मतदान करतील. शिवसेनेने मराठी, हिंदू यांना संरक्षण दिले आहे ते नाही विसरू शकत. भाजपाच्या बाजूने लोकांमध्ये वातावरण नाही असा विश्वास माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आपल्याच घराची राखरांगोळी कशी होईल अशी स्वप्न पाहणारी ही लोकं आहेत. वक्तव्य करून महापौर होत नाही. पहारेकरी, अटळ लोकांनी सगळ्या शब्दांचे खेळ पाहिले आहेत. मतदारांना ठरवू द्या. ऑनलाईन भेटण्याची सुविधा आहे. एकाचवेळी सगळ्यांशी बोलू शकतो. उद्धव ठाकरेंनी मन की बात नव्हे तर जन की बात केली आहे. लोकांच्या मनात काय आहे ते उद्धव ठाकरेंनी केले आहे. शिवसेनेत असताना बेंबीच्या देठापासून भाजपाविरोधात बोलले होते. संजय राठोड सगळ्यात जास्त बदनाम भाजपामुळे झाला. आता त्यांनाच मंत्री बनवले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्याप्रमाणे मुंबई, महाराष्ट्रात हायहॉल्टेज ड्रामा लोकं पाहत आहे. बाळासाहेबांचे घर फोडण्याचं काम होतेय ते लोकांना आवडत नाही. शिवसेना ज्यांनी मोठी केली तेच फोडण्याचं पाप करतायेत ते चुकीचे आहे. शिवसेनेचाच महापौर होणार आहे. लोकांची जी विचारधारा आहे. विविध माध्यमातून आम्ही पाहतोय. लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हवे आहेत. शेलार त्यांचे काम करतील आम्ही आमचं काम करू. फोडाफोडी करणं भाजपाचं काम आहे असा आरोप किशोरी पेडणेकरांनी लावला. दरम्यान, संजय शिरसाट यांचं ट्विट आल्यानंतर आम्हाला आनंद होण्याची गरज नाही. शिंदे गटात उद्धव ठाकरेंबाबत सर्वाधिक बोलणारे संजय शिरसाटच होते. आता त्यांनाच वाटतंय हम आपके है कोण अशा शब्दात पेडणेकरांनी शिरसाट यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार
मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी केली त्याला तडीपार करण्याचं काम मी आणि माझे सहकारी करू. आजच सर्व विषय बोलणार नाही. दिवस पावसाचे आहेत. पण वारंवार वर्षांनुवर्षे ज्या कंत्राटदारांना पोसलं आणि कंत्राटदारांनी ज्यांना पोसलं ते खड्ड्यांपासून हात झटकू शकत नाहीत. सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून शिवसेनेचे नेते हात झटकू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचं कोस्टल रोडचं काम, मेट्रो-३ मध्ये केलेला अहंकार यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड टाकला आहे. त्यापासून शिवसेना हात झटकू शकत नाही अशा शब्दात भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.