Pooja Chavan: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 10:38 AM2021-02-13T10:38:02+5:302021-02-13T10:39:16+5:30

Shivsena leader Sanjay Raut first reaction on Pooja Chavan suicide case: परळीतील तरुणीने पुण्याच्या वानवडी येथे आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे.

shivsena leader sanjay raut first reaction on Pooja Chavan suicide case | Pooja Chavan: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pooja Chavan: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Next

परळीतील तरुणीने पुण्याच्या वानवडी येथे आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. कारण या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव पुढे आलं आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारण्यात आलं असताना त्यांनी याप्रकरणावर बोलताना सावध पवित्रा घेतला आहे. (Pooja Chavan Suicide Case Shivsena Leader Sanjay Raut Replay) 

“पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणी…”; पंकजा मुंडेंनी आत्महत्येवर केलं भाष्य

पुण्याच्या वानवडी येथे पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं आत्महत्या केलीय यात शिवसेनेच्या एका मंत्र्याचं नाव पुढे येतंय असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी यावर राज्याचे मुख्यमंत्री बोलतील असं उत्तर दिलं आहे. राऊत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलणं टाळलं. आपल्या दैनंदिन नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांनी गाडीत बसताना केवळ एका शब्दात 'ऑफ द रेकॉर्ड' या प्रकरणावर भाष्य केलं.

कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही तरुणी मूळची बीडच्या परळीतील असून ती काही दिवसांपूर्वी पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तिनं पुण्यात वानवडी येथे एका रहिवाशी इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यात पूजा चव्हाणबद्दल कथित मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये संभाषण सुरू असल्याचं समोर आलं आहे. या २२ वर्षीय तरुणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. 

मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी
आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Read in English

Web Title: shivsena leader sanjay raut first reaction on Pooja Chavan suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.