Join us

विनोद घोसाळकरांनी रद्ध केला मुलाचा विवाह सोहळा; मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 1:52 PM

डॉ.विनोद घोसाळकर यांनी वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची  भेट घेऊन सदर लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ रद्द करत असल्याचे पत्र दिले.

मुंबई : एकीकडे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांनी मुलाचा विवाह सोहळा रद्ध केला होता.मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी मी जबाबदार या मोहिमेला प्रतिसाद देत म्हाडाचे सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांनी त्यांचा धाकटा मुलगा सौरभ घोसाळकर यांचा विवाह सोहळा रद्द केला.सौरभचा विवाह येत्या रविवार दि, 28 रोजी सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेल मध्ये होता. घोसाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना या सोहळ्यासाठी वेळ राखून ठेवण्याची विनंती आधी केली होती. मात्र सध्या मुंबईत कोरोनाचे झपाट्याने वाढते रुग्ण आणि मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी मी जबाबदार या आवाहना नुसार आम्ही लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ रद्द केला अशी माहिती मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी दिली.मंगळवारी संध्याकाळी डॉ.विनोद घोसाळकर यांनी वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची  भेट घेऊन सदर लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ  रद्द करत असल्याचे पत्र दिले. आपण एक चांगला निर्णय घेतला असे गौरवोद्गार मुख्मंत्र्यानी यावेळी काढले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाम्हाडामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस