शिवसेनेने केली भाजपाची कोंडी

By admin | Published: March 17, 2016 01:22 AM2016-03-17T01:22:14+5:302016-03-17T01:22:14+5:30

मेट्रो -३ साठी पालिकेचे भूखंड देण्याचा वादग्रस्त ठरलेला प्रस्ताव विरोधी पक्षाच्या मदतीने सुधार समितीमध्ये मंजूर करून घेणाऱ्या भाजपाला मित्रपक्ष शिवसेनेने आज पालिका महासभेत

Shivsena made BJP's stand | शिवसेनेने केली भाजपाची कोंडी

शिवसेनेने केली भाजपाची कोंडी

Next

मुंबई: मेट्रो -३ साठी पालिकेचे भूखंड देण्याचा वादग्रस्त ठरलेला प्रस्ताव विरोधी पक्षाच्या मदतीने सुधार समितीमध्ये मंजूर करून घेणाऱ्या भाजपाला मित्रपक्ष शिवसेनेने आज पालिका महासभेत दणका दिला़ कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रोच्या प्रकल्पासाठी जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने विरोधी पक्षातील सदस्यांच्या मदतीने फेटाळून लावला़ पालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात शिवसेनेने खो घातल्याने युतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे़
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पासाठी मेट्रो रेल महामंडळाने पालिकेकडून १७ भूखंड मागितले आहेत़ यापैकी काही भूखंड ११ महिन्यांच्या कालावधीसाठी तर काही भूखंड कायमस्वरूपी मेट्रो रेल्वेसाठी द्यावी लागणार आहेत़ मात्र, या प्रकल्पामुळे गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील शेकडो वृक्षांची तोड, हुतात्मा चौक या ऐतिहासिक वास्तूची जागाही जाणार आहे़ त्यामुळे या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला आहे़ त्याच वेळी मित्रपक्ष भाजपाने लोकहिताचा मुद्दा काढून विकासाला महत्त्व देण्याचा आग्रह धरला.
मात्र, काँगे्रस, राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या मदतीने भाजपाने सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून घेतला़ पालिकेच्या महासभेत आज हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रशासनाने आणला़, परंतु विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी मेट्रोचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली़ काँगे्रसने अचानक भूमिका बदलल्यामुळे शिवसेनेच्या मागणीला बळ आले़ त्यामुळे भाजपाला काही लक्षात येण्याआधीच शिवसेनेने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला़ (प्रतिनिधी)

पालिकेच्या भूखंडांची खैरात
मेट्रो प्रकल्पांसाठी पालिकेने भूखंडांची अवघ्या एक रुपया नाममात्र दरामध्ये खैरात वाटली आहे़ मोक्याचे भूखंड कवडीमोल दामात भाड्याने देण्याच्या पालिकेच्या या भूमिकेला सुधार समिती सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता़ या प्रकल्पात गिरगावमधील काही इमारती पाडाव्या लागणार आहेत़

‘आधी गप्प का बसले’
हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडल्यानंतर भाजपाने
त्यावर हरकत का घेतली नाही़ त्यामुळे हा प्रस्ताव सर्वानुमते दप्तरी
दाखल केला आहे़ तेव्हा भाजपा गप्प का होते?
- प्रवीण छेडा (विरोधी पक्षनेते)

आता तीन महिने प्रतीक्षा
या बैठकीला गैरहजर असलेला सदस्य पालिकेच्या अधिनियमानुसार तीन महिन्यांनंतर पालिका महासभेत प्रस्ताव पुन्हा आणता येते. मात्र तोपर्यंत भाजपाला आता प्रतीक्षा करावी लागणार आहे़

‘सेना-काँग्रेस अभद्र युती’
मेट्रो प्रकल्प तीनचा प्रस्ताव शिवसेना व काँग्रेसच्या अभद्र युतीमुळे दप्तरी दाखल झाला़ सुधार समितीमध्ये साथ देणाऱ्या काँगे्रसने विरोधी पक्षनेता बदलताच भूमिका बदलली़ बिल्डरांच्या हिताचा विचार करुन वृक्ष
कत्तली परवानगी देणाऱ्या शिवसेना व काँगे्रसने जनहिताचाही विचार करणे अपेक्षित होते़
- मनोज कोटक
(भाजपा गटनेते)

Web Title: Shivsena made BJP's stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.