शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी १४ सप्टेंबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 09:13 AM2023-09-10T09:13:08+5:302023-09-10T09:13:29+5:30

वकिलाकरवी बाजू मांडण्याची मुभा

Shivsena MLA disqualification hearing from September 14 | शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी १४ सप्टेंबरपासून

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी १४ सप्टेंबरपासून

googlenewsNext

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. आमदारांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मागविल्यानंतर आता याची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू होत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या १४, तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती अपात्र ठरवली होती, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य वेळेत आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे आपल्या आदेशात म्हटले होते. 

वकिलाकरवी बाजू मांडण्याची मुभा
    सुनावणीच्या नोटीस मिळाली असून १४ एप्रिल रोजी १२ वाजेची वेळ आपल्याला कळविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये स्वत: किंवा वकिलाकरवी आपली बाजू अध्यक्षांसमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे. 
    त्यानुसार आपण आपली बाजू मांडणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले.

 

Web Title: Shivsena MLA disqualification hearing from September 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.