Join us

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी १४ सप्टेंबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 9:13 AM

वकिलाकरवी बाजू मांडण्याची मुभा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. आमदारांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मागविल्यानंतर आता याची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू होत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या १४, तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती अपात्र ठरवली होती, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य वेळेत आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे आपल्या आदेशात म्हटले होते. 

वकिलाकरवी बाजू मांडण्याची मुभा    सुनावणीच्या नोटीस मिळाली असून १४ एप्रिल रोजी १२ वाजेची वेळ आपल्याला कळविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये स्वत: किंवा वकिलाकरवी आपली बाजू अध्यक्षांसमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे.     त्यानुसार आपण आपली बाजू मांडणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेआमदारशिवसेनान्यायालय