Join us

‘ठाकरे’ चित्रपटाच्या वादाला शिवसेना-मनसे संघर्षाची किनार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 4:49 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी शिवसेनेचे खासदार, निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक, मनसे नेते अभिजित पानसे यांच्यातील मानापमान नाट्यामुळे शिवसेना आणि मनसे आमनेसामने आली आहे.

मुंबई/ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी शिवसेनेचे खासदार, निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक, मनसे नेते अभिजित पानसे यांच्यातील मानापमान नाट्यामुळे शिवसेना आणि मनसे आमनेसामने आली आहे. मेंदूत कचरा साचल्याची टीका राऊत यांनी नाव न घेता पानसेंवर केली, तर बाळासाहेब सर्वसामान्य शिवसैनिकांचाही कधी अपमान करत नसल्याचे टिष्ट्वट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. बुधवारी मान्यवरांसाठी स्क्रीनिंग झाले. तेथे पानसेंसह कुटुंबीयांना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने ते संतापले. राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे ऐकून न घेता ते सहकुटुंब तडकाफडकी बाहेर पडले. त्याची चर्चा झाल्याने गुरुवारी संजय राऊत यांनी टिष्ट्वट करत ‘लहान मेंदूत कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असा टोला लगावला. त्यानंतर मनसेने सोशल मीडियावर मोहीम उघडली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिकालाही प्रेमाने वागवायचे त्याचा अपमान करत नसत, हाच चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांनासुद्धा कळला नाही’ असे टिष्ट्वट केले. दरम्यान, राऊत यांनी नामोल्लेख वगळता पानसेंवर केलेले ते टिष्ट्वट डिलिट केले.अभिजीत पानसे यांना पुन्हा एकदा शिवसेनेने फसविले. या आधी आदित्य ठाकरे यांना मोठे करून पदावरून बाजूला केले. आता चित्रपट बनवून घेऊन फसविले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा चित्रपट करण्याआधी पानसेंना म्हणाले होते, ‘हे तुला फसवतील.’ पानसे यांच्या अपमानाचा मनसे निषेध करीत आहे.चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मनसे पुढील भूमिका घेईल, असे मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.अपमान हा अपमान असतो, मग तो कोणाचाही असो. चित्रपटावर खासदार संजय राऊत यांचा जितका हक्क आहे, तितका मनसे नेते अभिजीत पानसेंचाही आहे, असेमत मनसैनिक अनील म्हात्रे यांनी व्यक्त केले.>‘सपोर्ट’ सत्यालाच मिळतोठाण्यातील कलाकारांनीही घडलेल्या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर ‘जे झाले ते दुदैर्वी आहे आणि ‘सपोर्ट’ हा सत्यालाच मिळतो’ असे अभिजीत पानसे यांनी याबाबत अधिक माहिती देताना ‘लोकमत’ला सांगितले.>ठाणेकरांतर्फे सहकुटुंब सत्कारपानसे यांच्या झालेला अपमानाला उत्तर म्हणून मनसैनिक महेश कदम हे दुपारी १२. ३० चा पहिला शो हा ९६० ठाणेकरांना मोफत दाखविणार आहेत आणि चित्रपटादरम्यान ठाणेकर नागरिकांतर्फे पानसे यांचा सहकुटुंब सत्कार करणार आहेत. यात सिग्नल शाळेतील ५० विद्यार्थ्यांनाही हा चित्रपट पाहण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘मी पानसेंच्या बाजूने’अभिजीत पानसे यांचा झालेला अपमान चुकीचा आहे. कोणी कुठे बसावे, हा जसा राजकारणाचा अलिखित प्रोटोकॉल असतो तसा सिनेमाचाही आहे. सिनेमाचा सगळ््यात महत्त्वाचा माणूस हा दिग्दर्शक असतो, निर्माताही महत्त्वाचा आहे. सिनेमा हे दिग्दर्शकाचे प्रोडक्ट असते. तो आई असतो. असे कोण इतके महत्त्वाचे होते की दिग्दर्शकाची जागा त्यांना देण्यात आली? निर्मात्यांची पानसेंवर कोणत्या प्रकारची नाराजी होती हे कळत नाही. याआधी ठाकरे चित्रपटाच्या ट्रेलरवेळीदेखील पानसे व्यासपीठावर नव्हते. माझ्या आयुष्यातील एकही ट्रेलर नाही जिथे दिग्दर्शक व्यासपीठावर बसला नाही. ‘ठाकरे’ सिनेमा आणि बाळासाहेब यांच्याबद्दल मला आदर आहेच. पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि एक दिग्दर्शक म्हणून मी पानसेंच्या बाजूने आहे. - विजू माने, दिग्दर्शक

टॅग्स :ठाकरे सिनेमा