मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालिका आयुक्तांकडे मंगळवारी केली़ देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीमागे कचरामाफिया आहे़ तसेच शिवसेना व मनसेचेही लागेबांधे असल्याचा आरोप करीत निरुपम यांनी चौकशीची मागणी केली़पालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनीही देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीचा मुद्दा लावून धरला आहे़ २० वर्षे सत्तेवर असलेले शिवसेना-भाजपा युती कचऱ्याचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरली आहे़ मात्र विधानभवनामध्ये आगीप्रकरणी शिवसेनेला कोंडीत पकडणारी भाजपा महापालिकेत मैत्रीला जागली़ हा भाजपाचा दुटप्पीपणा असून कचऱ्याप्रश्नी ते आपला हात झटकू शकत नाही, असा हल्ला निरुपम यांनी चढविला़ शिवसेना व मनसेचे नेतेही तेथे सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला़ विरोधकांचा सभात्यागया आगीप्रकरणी विरोधी पक्षांनी स्थायी समितीमध्ये सभा तहकुबीची सूचना मांडली़ कचरा व आग हे प्रश्न हाताळण्यात युती अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला़
देवनारमध्ये शिवसेना मनसेचे लागेबांधे
By admin | Published: March 23, 2016 3:59 AM