Join us

'बघून घेऊ...', अनिल देशमुखांवरील ईडीच्या चौकशीबाबत संजय राऊत दोनच शब्दात बोलले! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 10:32 AM

Sanjay Raut: अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. 

Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवाससाठी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) काल छापे टाकले. यात जवळपास ९ तासांहून अधिक काळ चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशीरा अनिल देशमुख यांच्या स्वीयसहाय्यक आणि खासगी सचिवांना अटक केली आहे. तर आज सकाळी ११ वाजता अनिल देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. अनिल देशमुखांच्या या ईडी चौकशीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. 

अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स, सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश

"केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. काल शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असोत किंवा मग शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ", असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

अनिल देशमुखांचा पाय खोलात; पीए संजीव पलांडे, कुंदन शिंदेंना ईडीकडून अटक

काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्यच नाही"देशात भाजपाला पर्याय देणारी भक्कम आघाडी निर्माण करायची असेल तर काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होऊ शकत नाही, असं विधान मी याआधीही केलं होतं. शरद पवार यांनीही आता तीच भावना व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष देशातील मोठा पक्ष आहे. भाजपाला आव्हान निर्माण करायचं असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच आघाडी तयार होऊ शकेल", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतअनिल देशमुखभाजपाअंमलबजावणी संचालनालय