Join us

Shivsena: 'नायतर आपण मेलूच', शरद पवारांविरुद्द तुफान फटकेबाजी, बंडखोर आमदारांना हसू आवरेना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 4:58 PM

वसंत दादा माझे वडिल आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने मी मोठा झालेलो आहे आणि मी वसंत दादांना कधीच दगा देणार नाही

मुंबई - सांगोल्यासारख्या ग्रामीण भागातून आमदार म्हणून निवडून आलेले शहाजीबापू पाटील यांची ओळख आज झाडी, डोंगर आणि हॉटेल या अस्सल गावरान शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला झाली. मात्र, या माणसाने आयुष्यभर अतोनात संघर्ष केला आहे. त्यातूनच त्यांना आलेले काही अनुभव त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उपस्थित आमदारासमोर कथन केले. यावेळी, त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात तुफान फटकेबाजी केली. काहीही निर्णय घ्या, फक्त शरद पवारांबरोबर नको, नायतर आपण मेलूच असं म्हणताच रॅडीसन ब्लू हॉटेलच्या सभागृहात एकनाथ शिंदेंसह मोठा हशा पिकला.

वसंत दादा माझे वडिल आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने मी मोठा झालेलो आहे आणि मी वसंत दादांना कधीच दगा देणार नाही - शरद पवार आणि दीड वाजता तिथंच बातमी आली की, शरद पवारांनी बंड केलंय. 40 आमदार घेऊन काँग्रेसचं पळून गेलं. लगेच वसंत दादांना राजीनामा दिला, असा किस्सा शहाजी पाटील यांनी हॉटेलमध्ये आमदारांसमोर भाषण करताना सांगितला. त्यावेळी, सर्वांनाच हसू आले. त्यानंतरही, त्यांनी शरद पवारांनी कशारितीने अनेकांचं राजकारण संपवलं हेही त्यांनी सांगितलं. त्यावेळीही उपस्थित आमदारांना जोरजोरात हसत दाद दिली. तसेच, एकनाथ शिंदेंच्या कामाची स्टाईल आम्ही पाहिलीय. त्यामुळे, आम्हाला विश्वा आहे की, त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र प्रगत होईल, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या कामाचं जोरदार कौतुक केलं.  दरम्यान, यावेळी डोंगार-झाडी-हाटील या संभाषणाची सुरुवात कुठून आणि कशी झाली याचाही किस्साही गंमतशीरपणे त्यांनी सांगितला. 

एकनाथ शिंदेंनाही हसू आवरेना

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. अशात महराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली नसेल तरच नवलच. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता, एकनाथ शिंदेंसह सर्वांनीच शहाजी बापूंचं मनापासून कौतुक केलं. तसेच, पुन्हा एकदा हा डायलॉग म्हणून दाखवण्याची  विनंती केली. त्यानंतर, त्यांनीही हा डायलॉग बोलून दाखवला, त्यावेळी सर्वत्र हशा पिकला.

टॅग्स :सांगोलाशरद पवारएकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस