Shivsena: राज्यात लवकरच परिवर्तन, साताऱ्यात कंदी पेढे वाटून शिवेंद्रराजेंचं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 01:36 PM2022-06-21T13:36:13+5:302022-06-21T13:52:45+5:30

राज्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या योग्या नियोजनामुळे पुढील काळात राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी पाहायला मिळेल

Shivsena: Soon change in the state, Shivendra Raje's prediction by distributing kandi plants in Satara on eknath shinde | Shivsena: राज्यात लवकरच परिवर्तन, साताऱ्यात कंदी पेढे वाटून शिवेंद्रराजेंचं भाकीत

Shivsena: राज्यात लवकरच परिवर्तन, साताऱ्यात कंदी पेढे वाटून शिवेंद्रराजेंचं भाकीत

googlenewsNext

सातारा - राज्यात घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींसंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याने भाजप नेत्यांकडून अनेक कमेंट केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून ट्विटरच्या माध्यमातून आणि माध्यमांना प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टिका करण्यात येत आहे. तसेच, लवकरच राज्यात सरकार बदलणार असल्याचेही भाकीत केले जात आहे. साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

राज्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या योग्या नियोजनामुळे पुढील काळात राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी पाहायला मिळेल. प्रामुख्याने महाविकास आघाडीत असलेली धुसफूस या सर्वांला कारणीभूत असल्याचे सांगत राज्यामध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असे भाकीत देखील सातारचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात बोलताना केले आहे. विधान परिषदेमध्ये मिळालेल्या विषयाचा आनंद उत्सव साताऱ्यातील मोती चौक येथे कंदी पेढे वाटप करुन साजरा करण्यात आला. त्यावेळेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे माध्यमांशी बोलत होते. सध्या राज्यात घडलेल्या राजकीय बंडावर त्यांनी भाष्य केलं आहे. 

एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात?

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते भाजपच्या संपर्कात आहेत का, असे विचारले असता राणे म्हणाले, ''असं सांगायचं नसतं, मग नॉट रिचेबल राहून काय उपयोग''. महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार का, असे विचारले असता राणे म्हणाले, "एक दिवस तरी मुख्यमंत्र्यांना स्वस्थ काढू द्या ना".

एकनाथ शिंदेसह २५ आमदार सूरतमध्ये!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील २५ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या गुजरातच्या सूरतमधील मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि गुजरात भाजपाच्या नेत्यांनीही शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट

''शाब्बास एकनाथजी योग्यवेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.'', असे ट्विट राणेंनी केलं आहे. 
 

Read in English

Web Title: Shivsena: Soon change in the state, Shivendra Raje's prediction by distributing kandi plants in Satara on eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.