मुंबई- शिवसेनेसोबत युती होणार असे आपण ठामपणे सांगत आहात , पण युती झाली तर आपण भाजप सोडू असे नारायण राणे म्हणत आहेत, हे कसे? या खा. संजय राऊत यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना आमच्याशी सवतीसारखी वागली म्हणून राणेंना पक्षात घ्यावे लागले. तुम्ही नीट वागला असतात तर ही वेळ आलीच नसती!यूपीएल प्रस्तुत लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार खा. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. उभा महाराष्ट्र डोळे लावून बसलेल्या या मुलाखतीमध्ये राऊत यांनी विचारलेल्या ‘रोखठोक’ प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी कधी दिलखुलासपणे, कधी मिश्कीलपणे, तर कधी आक्रमकपणे ‘सामना’ केला. २०१९ च्या निवडणुकीत तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांशी लढण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेचा वारसा लाभलेल्या शिवसेनेला भाजपाशी युती करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. राजकारणातील वाढती गुन्हेगारी हा सर्वच पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडून द्यायचे की नाही, हे आता जनतेनेच ठरविण्याची गरज असल्याचे परखड मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले.> ।। राऊत : राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे, असे म्हटले जाते. अन्य पक्षांतील गुन्हेगारांना सध्या भाजपात प्रवेश देऊन शुद्धीकरण केले जात आहे. हे तुम्हाला पटते का?।। मुख्यमंत्री : भाजपात फार गुन्हेगार आले, असे मी मानत नाही. पण, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत भाजपासह सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काहीजण एखाद्याला घेऊन माझ्याकडे येतात व त्याला पक्षात घेण्याचा आग्रह धरतात. तेव्हा मी म्हणतो की, याचे भाजपावर प्रेम नाही. कालपर्यंत त्याला तेथे संरक्षण मिळत होते, म्हणून तो तेथे होता. आता संरक्षण मिळवण्याकरिता तो भाजपात येत आहे. मात्र, लोकांची राजकीय पक्षाकडून जशी अपेक्षा असते, तशीच माझी जनतेकडून अपेक्षा आहे. जनतेने निग्रह करून अशा गुन्हेगारांना पाडले पाहिजे.।। राऊत : सरकारला साडेतीन वर्षे पूर्णझाली. राज्य कसं चाललंय?।। मुख्यमंत्री : कोणतेही काम सर्वोत्तम कधीच नसते. मात्र, आधीच्या सरकारांशी तुलना केल्यास राज्यात मोठमोठी कामे झाल्याचे दिसते. २० वर्षांपासून केवळ कागदोपत्री असलेले मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प या काळात पूर्ण झाले किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात पाणी अडवा, पाणी जिरवा, ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली जात आहे. जलयुक्त शिवार योजनेतून दुष्काळमुक्तीसाठी मोठी कामे करण्यात आली. पाण्याचे महत्त्व लोकांना समजू लागले. या मोहिमेला एक प्रकारे लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न स्थानिक रहिवासी, सामाजिक संस्था करत आहेत.।। राऊत : मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता. विद्यमान सरकारचा रिमोट कंट्रोल कुणाकडे आहे?।। मुख्यमंत्री : कुणाकडेच नाही. नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा सरकारवर थेट कंट्रोल आहे. रिमोट कंट्रोल नाही. राज्यात काय करावे अथवा काय करू नये, हे मोदी किंवा शहांकडून कधीच सांगितले जात नाही. केवळ मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीमध्ये घेतली जाते, तेव्हा स्वच्छता अभियानासारख्या सार्वजनिक हिताच्या व सरकारने प्राधान्य दिलेल्या मोहिमा राबवण्यासाठी आग्रह केला जातो. मात्र, कुठल्याही राज्य सरकारने लोकानुनयी निर्णय करू नये, असा मोदी-शहा यांचा आग्रह असतो. कारण, त्यामुळे इतर राज्यांवर त्याचे अनुकरण करण्याकरिता दबाव येतो. त्यामुळे वास्तववादी निर्णय घेऊन अमलात आणण्याचा त्यांचा आग्रह असतो.।। राऊत : गेल्या साडेतीन वर्षांत कधी नव्हे ते शेतकरी संपावर गेले, हमीभाव नसल्याने शेतमाल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली?।। मुख्यमंत्री : परिवर्तन एका दिवसात घडू शकत नाही. ही परिस्थिती कायमस्वरूपी बदलावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राची सिंचन क्षमता केवळ १८ टक्के आहे. तब्बल ८२ टक्के शेती कोरडवाहू असून शेतकरी निसर्गावर अवलंबून आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठीच जलयुक्त शिवारसारख्या मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. आपण सत्तेत आलो, तेव्हा २० हजार गावांमध्ये दुष्काळ होता. असे असतानाही राज्याचा कृषी विकासदर २२ टक्के आहे. राज्याच्या इतिहासातील हे सर्वात जास्त उत्पादन आहे. मागील वर्षी ७५ टक्के पाऊस झाला. तरीही, कृषी उत्पादन वाढले व मागील सरकारच्या काळातील कृषी उत्पादनाचा जो सर्वोच्च दर आहे, तेवढेच उत्पादन करण्यात सरकारला यश आले. मागील सरकारने जेव्हा ते उद्दिष्ट साध्य केले, त्यावर्षी १२५ टक्के पाऊस झाला होता. पाऊस कमी पडला, तरी शेतकºयांनी चांगले उत्पादन घेतले, याचे कारण जलयुक्त शिवार योजना आहे. नाशिकच्या कांदा उत्पादकांनी यावर्षी जेवढा पैसा कमावला, तेवढा यापूर्वी कधीच कमावला नाही, असे ‘लोकमत’ला मुलाखत देऊन सांगितले.।। राऊत : कर्ज चुकवता आले नाही, म्हणून विदर्भातील दोन शेतकºयांनी आजच आत्महत्या केली. दुसरीकडे कर्जमाफी किती जणांना दिली, याचा तपशील सरकारकडे नसणे गंभीर नाही का?।। मुख्यमंत्री : तुम्ही दिल्लीला जास्त असता आणि महाराष्ट्रात कमी असता. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात काय सुरू आहे, त्याची माहिती नाही. सरकारने कर्जमाफीची जिल्हावार संपूर्ण माहिती विधिमंडळामध्ये सादर केली. ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली. कर्जमाफीची संपूर्ण माहिती आपण कुणालाही पेनड्राइव्हमध्ये देऊ शकतो.।। राऊत : कोरेगाव-भीमा प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र पेटत होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकार, मुख्यमंत्री कुठे होते?।। मुख्यमंत्री : ही घटना अतिशय चुकीची होती. त्यासाठी बºयाचशा गोपनीय गोष्टी कारणीभूत आहेत. काहींचे टिष्ट्वट, काहींचे या प्रकरणावरील भाष्य चुकीचे होते. त्याबाबत, सार्वजनिक ठिकाणी बोलणे योग्य नाही. मात्र, सरकारने ही परिस्थिती अतिशय योग्य पद्धतीने हाताळली. १० ते १२ लाख लोक एवढ्याशा जागी आदरांजली वाहण्याकरिता जमा झाले. मात्र, कुणी जखमीही झाले नाही. सर्वांना दर्शन करून परत पाठवले. देशातील काही राज्यांत बंदमध्ये माणसे मरण पावली. कोरेगाव-भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला, तेव्हा काही माध्यमांनी बंद फसल्याची टिप्पणी केली. त्यानंतर, हिंसाचार झाला. मी माध्यमांना दोष देत नाही. मात्र, अशा घटनांचे वार्तांकन अतिशय जबाबदारीने केले पाहिजे.।। राऊत : अहमदनगर हत्याकांडामध्ये आमदारावर गुन्हा दाखल झाला. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, हे राज्याला सक्षम गृहमंत्री असल्याचे चिन्ह आहे का?।। मुख्यमंत्री : महाराष्ट्रात आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते नव्हते, हीच खरी अडचण होती. गृह विभागाचे जवळजवळ सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यावे लागतात. स्व. आर.आर. पाटील गृहमंत्री असताना आयपीएस अधिकाºयांच्या बदल्यांच्या फायली चारचार महिने मुख्यमंत्र्यांकडेपडून राहत. स्वत: आबांनी याबद्दलखंत व्यक्त केली होती. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडेच असावे, असे त्यांचेस्पष्ट मत होते. राहिला प्रश्न वाढत्या गुन्ह्याचा, तर त्यापेक्षा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे. २०११ साली १०० पैकी केवळ आठ गुन्हेगारांना शिक्षा व्हायची. आपल्या कार्यकाळात दोषसिद्धीचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांवर पोहोचले आहे.।। राऊत : महाराष्ट्राची जनता एक बैलगाडी शोधतेय. ती कुठे आहे? सिंचन घोटाळ्याच्या पुराव्यांची ती बैलगाडी अजून न्यायालयापर्यंत पोहोचली नाही का?।। मुख्यमंत्री : बैलगाडीभर नव्हे, आता ट्रकभर पुरावे झाले आहेत. या प्रकरणामध्ये आतापर्यंत २१ गुन्हे दाखल झाले आहेत. चार प्रकरणांचा तपास पूर्ण करून आरोपपत्रही दाखल झाले आहे. जे काय घडले, ते नियमानुसार नव्हते. राज्याच्या तिजोरीतील पैसा दुसरीकडे वळवण्यात आला होता, हेच यातून सिद्ध होते.।। राऊत : छगन भुजबळांच्या बाजूच्या काही कोठड्या रिकाम्या आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्या कधी भरणार आणि घोटाळ्यातील मोकाट आरोपी कधी गजाआड होणार?।। मुख्यमंत्री : तुम्ही काही काळजी करू नका. त्या कोठड्या पण भरतील.।। राऊत : २०१९ मध्ये काय चित्र असेल?।। मुख्यमंत्री : महाराष्ट्रातील सरकार १०० टक्के कायम राहील. माध्यमांनी कितीही टीका केली, तरी सामान्य जनतेचा मोदींवर विश्वास आहे. मोदी देशाच्या हिताकरिता प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची जनभावना आहे. २०१९ मध्ये भाजपाला आधीपेक्षा जास्त जागा मिळतील आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येईल.।। राऊत : तुमच्या आणि अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का?।। मुख्यमंत्री : देशाच्या तिजोरीत पैसा जमा व्हायला सुरुवात झाली. कधी नव्हे एवढा काळा पैसा गेल्या तीन वर्षांमध्ये जमा झाला. १०० पेक्षा जास्त देशांतील टॅक्स हेवनमध्ये भारतीयांनी पैसा जमा केल्यास त्याबद्दल भारताला सूचित करण्याबाबतचे करार केले गेले. त्यामुळे गेल्या २० वर्षांत जेवढा काळा पैसा विदेशातून परत आणला गेला नाही, तेवढा या तीनचार वर्षांत
शिवसेना सवतीसारखी वागल्याने राणेंना घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 4:58 AM