Shivsena: 'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:23 PM2022-06-10T13:23:37+5:302022-06-10T13:24:32+5:30

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात.

Shivsena: We don't like 'this', Sanjay Gaikwad left Trident Hotel and reached MLA's residence | Shivsena: 'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास

Shivsena: 'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास

googlenewsNext

मुंबई - राज्यसभेच्या 6 जागांसाठी होत असेलल्या मतदानाला सुरुवात झाली असून विधानभवनात दुपारी 12.25 वाजेपर्यंत 238 आमदारांनी मतदान केले आहे. आता, शिवसेनाआमदारही हॉटेल ट्रायडंटमधून विधानभवनाकडे मतदानासाठी येत आहेत. तत्पूर्वी शिवसेनेच्या एका आमदाराने हॉटेलवर होणारा वारेमाफ खर्च पाहून थेट आमदार निवास गाठल्याचे समजते. आमदार संजय गायकवाड यांनी फाईव्ह स्टार हॉटेलची ट्रीट नाकारत थेट आमदार निवा

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. पण, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात काही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मंगळवार दुपारपासून मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये ठेवले आहे. शिवसेनेच्या जवळपास २५ आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्याची आल्याची चर्चा आहे. मात्र, या आमदारांवर होणारा अव्वाच्या सव्वा खर्च पाहता एका आमदारातील सामान्य माणूस जागा झाल्याचं दिसून आलं. 
बुलडाण्याच्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अफाट होणारा खर्च टाळण्यासाठी हॉटेल सोडून आमदार निवास गाठलं. विशेष म्हणजे आपण हॉटेल सोडून जात असल्याचं त्यांनी शरद पवार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कळवलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं खुद्द पवारांनीच स्वागत केल्याचं समजतं. एका रस्त्यावरील सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार असा संजय गायकवाड यांचा प्रवास आहे. त्यामुळेच, त्यांना हा विनाकारण, वारेमाफ होणारा खर्च टाळावा वाटला. 

शिवसेनेनं हॉटेल ट्रायडंटमध्ये 70 रुम बुक केल्या आहेत. ज्यात पक्षाच्या आमदारांसह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. आमदारांना या हॉटेलमध्ये ठेवण्याचा खर्चही तेवढाच जास्त आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये एका रुमचं एका दिवसाचं भाडं सुमारे 16 हजार रुपये आहे. म्हणजेच एक दिवसाचा खर्च 11 लाख 20 हजार रुपये आहे. पक्षाने 4 दिवसांसाठी या हॉटेलमध्ये रुम बुक केल्या आहेत. त्यामुळे, चार दिवसाचा खर्च जवळपास 44 लाख 80 हजार रुपये एवढा होत आहे.

म्हणून आमदार हॉटेलमध्ये - राऊत

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवले, याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली. 'राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक आणि किचकट असते. हे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने असते. त्याबाबत आमदारांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे,' असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. 

Web Title: Shivsena: We don't like 'this', Sanjay Gaikwad left Trident Hotel and reached MLA's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.