Join us  

शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज

By admin | Published: January 05, 2017 5:40 AM

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी होणार आहे. यानिमित्ताने पालिका निवडणुकीचे नारळ फुटणार असून पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

उल्हासनगर : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी होणार आहे. यानिमित्ताने पालिका निवडणुकीचे नारळ फुटणार असून पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाला कल्याण जिल्हा शिवसेनाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी उपस्थित राहणार आहेत.उल्हासनगर महापालिकेची निवडणूक महिन्यावर येवून ठेपली आहे. लहान पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच ओमी टीमनेही ४८ उमेदवारांची घोषणा केली आहे. खासदार शिंदे यांच्या २ कोटी २० लाखाच्या निधीतून काँॅक्रीटचे रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृह, नाले-गटारे बांधणे, उद्यानाचे सुशोभीकरण, व्यायामशाळा, समाजमंदिर, ज्येष्ठ नागरिक कट्टा, जॉगिंग ट्रॅक, सामाजिक सभागृह असे भूमिपूजनाचे कार्यक्रम होणार आहे. शहरातील कॅम्प नं-१ परिसरातून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सांगता कॅम्प नं-५ येथील विकासकामाने होणार आहे. यावेळी पत्रकार परिषद घेवून खासदार श्ािंदे माहिती देण्यात येणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. तसेच विकासकामांसह पक्षाची भूमिका मांडणार असून युती बाबतचे संकेत शिंदे देणार आहेत. त्यांच्या बोलण्याकडे भाजपासह शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. गेल्याच आठवडयात आमदार बालाजी किणीकर यांच्या आमदार निधीतून काँॅक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन होवून कामाला सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)