शिवसेनेचे देणगीदार वाढले; मात्र मनसेच्या देणगीत घट!

By admin | Published: January 19, 2017 12:27 AM2017-01-19T00:27:16+5:302017-01-19T00:27:16+5:30

आकडेवारीच्या आधारे प्रादेशिक पक्षांच्या देणगीदारांचा आलेख असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी मांडला आहे.

Shivsena's donors grew; But the decrease in MNS's donation! | शिवसेनेचे देणगीदार वाढले; मात्र मनसेच्या देणगीत घट!

शिवसेनेचे देणगीदार वाढले; मात्र मनसेच्या देणगीत घट!

Next


मुंबई : निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे प्रादेशिक पक्षांच्या देणगीदारांचा आलेख असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी मांडला आहे. त्यानुसार गत आर्थिक वर्षात शिवसेनेच्या देणग्यांमध्ये मोठी वाढ, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देणग्यांमध्ये मोठी घट झाल्याचे निष्पन्न झाले.
२०१४-१५ या आर्थिक वर्षात शिवसेनेला ३२.२९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यात मोठी वाढ होऊन २०१५-१६ या वर्षात शिवसेनेला ८६.८४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. याच काळात मनसेच्या देणग्या मात्र ६.०८ कोटींवरून २८ लाख रुपयांपर्यंत घटल्या. संस्थेने या अहवालामध्ये २० हजार रुपयांपेक्षा अधिक देणग्या प्राप्त झालेल्या प्रादेशिक पक्षांचाच विचार केला आहे.शिवसेनेला गत आर्थिक वर्षात 143देणगीदारांकडून ८६.८४ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी सर्वाधिक देणग्या देणारे पुढील प्रमाणे
>शिवसेनेचे देणगीदारदेणगी
व्हिडिओकॉन इंडस्ट्री लि. ८५ कोटी
झाड इंटरप्राइस२० लाख
गरवारे ट्रस्ट११ लाख
साई इंटरप्राइस१० लाख
विनायक निम्हण१० लाख
वाडा इंडक्शन असो.७ लाख
भारतीय कामगार सेना५.५०लाख
शिवसेना संसदीय पक्ष५.२५ लाख
केवल किरण क्लोथिंग लि. ५.१ लाख
यासर अराफत इंस्फ्रा अ‍ॅण्ड डेव्ह. लि. ५.१ लाख
>मनसेचे देणगीदारदेणगी
सेरेनिटी ट्रेड प्रा.लि. १० लाख
अविनाश जाधव५ लाख
महा. नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना ४ लाख
भालारिया मेटल क्राफ्ट प्रा. लि.३.५० लाख
एक्सेल एंटरटेंमेंट प्रा. लि.१.५० लाख
मनसे माथाडी कामगार सेना१.१ लाख
करण दुंबाले१ लाख
अज्ञात५५ हजार
संजय ताम्हाणे५१ हजार
प्रल्हाद म्हात्रे५१ हजार

Web Title: Shivsena's donors grew; But the decrease in MNS's donation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.