Join us

शिवसेनेचे देणगीदार वाढले; मात्र मनसेच्या देणगीत घट!

By admin | Published: January 19, 2017 12:27 AM

आकडेवारीच्या आधारे प्रादेशिक पक्षांच्या देणगीदारांचा आलेख असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी मांडला आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे प्रादेशिक पक्षांच्या देणगीदारांचा आलेख असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी मांडला आहे. त्यानुसार गत आर्थिक वर्षात शिवसेनेच्या देणग्यांमध्ये मोठी वाढ, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देणग्यांमध्ये मोठी घट झाल्याचे निष्पन्न झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात शिवसेनेला ३२.२९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यात मोठी वाढ होऊन २०१५-१६ या वर्षात शिवसेनेला ८६.८४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. याच काळात मनसेच्या देणग्या मात्र ६.०८ कोटींवरून २८ लाख रुपयांपर्यंत घटल्या. संस्थेने या अहवालामध्ये २० हजार रुपयांपेक्षा अधिक देणग्या प्राप्त झालेल्या प्रादेशिक पक्षांचाच विचार केला आहे.शिवसेनेला गत आर्थिक वर्षात 143देणगीदारांकडून ८६.८४ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी सर्वाधिक देणग्या देणारे पुढील प्रमाणे >शिवसेनेचे देणगीदारदेणगीव्हिडिओकॉन इंडस्ट्री लि. ८५ कोटीझाड इंटरप्राइस२० लाखगरवारे ट्रस्ट११ लाखसाई इंटरप्राइस१० लाखविनायक निम्हण१० लाखवाडा इंडक्शन असो.७ लाखभारतीय कामगार सेना५.५०लाख शिवसेना संसदीय पक्ष५.२५ लाख केवल किरण क्लोथिंग लि. ५.१ लाख यासर अराफत इंस्फ्रा अ‍ॅण्ड डेव्ह. लि. ५.१ लाख >मनसेचे देणगीदारदेणगीसेरेनिटी ट्रेड प्रा.लि. १० लाखअविनाश जाधव५ लाखमहा. नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना ४ लाखभालारिया मेटल क्राफ्ट प्रा. लि.३.५० लाख एक्सेल एंटरटेंमेंट प्रा. लि.१.५० लाख मनसे माथाडी कामगार सेना१.१ लाख करण दुंबाले१ लाखअज्ञात५५ हजारसंजय ताम्हाणे५१ हजारप्रल्हाद म्हात्रे५१ हजार