उद्योग राज्याबाहेर नेण्यास शिवसेनेचा विरोध
By admin | Published: May 22, 2015 10:48 PM2015-05-22T22:48:07+5:302015-05-22T22:48:07+5:30
जैतापूर वीज प्रकल्पामुळे भाजपा- शिवसेनेत वाद निर्माण झाला असताना आता मुंबईतील उद्योगधंदे-आस्थापने गुजरातला हलवण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.
मुंबई : जैतापूर वीज प्रकल्पामुळे भाजपा- शिवसेनेत वाद निर्माण झाला असताना आता मुंबईतील उद्योगधंदे-आस्थापने गुजरातला हलवण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.
मुंबईतील कार्यालये येथून हटवल्यास आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचे महत्त्व राहील का, असा सवालही शिवसेनेने केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मुंबईतील उद्योगधंदे मुंबईहून गुजरातला हलवण्यास सेनेचा ठाम विरोध असल्याचे सांगितले.
मुंबईतील एअर इंडियाचे कार्यालय दिल्लीला हलवण्यात आले आहे. हे कार्यालय दिल्लीतून परत मुंबईला आणले पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. गेल्या ७५ वर्षांपासून दारूखाना येथे असलेला जहाज तोडण्याचा प्रकल्प गुजरातमध्ये उतंग जिल्ह्यात हलवण्यात येणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टला दरवर्षी १२० कोटी भरीव उत्पन्न देणाऱ्या या उद्योगात ५ हजार कामगार कार्यरत असून वर्षाला तब्बल ६० जुनी जहाजे तोडली जातात. हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ नये आणि या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी अलिबाग, दिघी किवा कोकणातील अन्य बंदराचा विचार व्हावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे. (प्रतिनिधी)