मुंबई - मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याची प्रचीती सध्या येत असून १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी सकाळी झेंडा वंदन करून शिक्षक सुट्टीवर जातात. शिक्षकांना भेटण्याचा हा शेवटचा दिवस याची जाणीव असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांनी चारकोप, कांदिवली येथे १५०० शिक्षक्यांच्या शिक्षक सन्मान सभेचे आयोजन केले होते. मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरु केल्याची कुजबुज उपस्थित शिक्षकांमध्ये मध्ये होती.
शिक्षकांचे विविध प्रश्न, १०० टक्के अनुदान, जुनी पेन्शन योजना, रात्र शाळेच्या शिक्षकांना सेवा संरक्षण, शिक्षकांचे त्यांच्या जिल्हातच समायोजन व इतर समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांनी सांगितले. सदर सभेस महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई, विधान परिषदेचे शिवसेनेचे गट नेते अँड.अनिल परब, मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभयंकर, शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण व अनेक शाळा, कॉलेजचे, विश्वस्त – मुख्याद्यापक व १५०० शिक्षक उपस्थित होते.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, शिवसेनेने शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवावी आणि शिक्षयांचा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे. आमदार अँड.अनिल परब यांनी सांगितले की,जर शिक्षकांचा आमदार जर असेल तर तो शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडवू शकतो. या सभेने मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरु केल्याची कुजबुज शिक्षकांमध्ये होती.