परळ-शिर्डी मार्गावर आता निमआरामऐवजी शिवशाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:43 AM2019-03-05T05:43:04+5:302019-03-05T05:43:19+5:30

मुंबईतून शिर्डीला निमआराम एसटीतून जाणाऱ्या प्रवाशांना आता शिवशाहीतून गारेगार प्रवास करता येईल.

Shivshahi instead of NimAram on Parel-Shirdi route | परळ-शिर्डी मार्गावर आता निमआरामऐवजी शिवशाही

परळ-शिर्डी मार्गावर आता निमआरामऐवजी शिवशाही

Next

- चेतन ननावरे 
मुंबई : मुंबईतून शिर्डीला निमआराम एसटीतून जाणाऱ्या प्रवाशांना आता शिवशाहीतून गारेगार प्रवास करता येईल. कारण एसटी महामंडळाने निमआराम गाड्यांच्या जागी शिवशाही चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्तास परळ ते शिर्डी या मार्गावर तीन शिवशाही धावत असून आठवड्यात आणखी दोन गाड्या या मार्गावर धावतील. अंधेरी ते शिर्डी अशी आणखी एक शिवशाही सुरू होणार असल्याचे एका वरिष्ठाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
परळहून शिर्डीसाठी या आधी दोन शिवशाही आणि तीन निमआराम एसटी होत्या. शिवशाहीला मिळणारा प्रतिसाद पाहून एसटी महामंडळाने निमआरामचे रूपांतर शिवशाहीत करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे, दुपारी ३.३० वाजता सुटणाऱ्या शिवशाही बसचे लोकार्पण सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त खासदार आणि एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या हस्ते झाले.
येत्या आठवडाभरात सकाळी ५.१५ आणि ११.३० वाजता सुटणाºया निमआराम बसेसच्या जागी शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. परळ-शिर्डीप्रमाणेच अंधेरीहून शिर्डीसाठी सकाळी ६.१५ वाजता सुटणाºया निमआराम बसच्या जागीही शिवशाही सुरू होणार असल्याचे एका वरिष्ठाने सांगितले. दोन्ही मार्गांवर आवश्यक शिवशाही बस उपलब्ध झाल्याचे परळ आगाराचे व्यवस्थापक सचिन चाचरे यांनी सांगितले.
>फक्त १० टक्के तफावत
परळ ते शिर्डी प्रवासासाठी निमआराम एसटीचे तिकीट प्रति प्रवासी ४६५ रुपये आहे. याउलट वातानुकूलित शिवशाहीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी केवळ १० टक्के तिकीट दरवाढ केल्याची माहिती आगार व्यवस्थापक सचिन चाचरे यांनी दिली.
>शिर्डी-मुंबईसाठीही सेवा
शिर्डीहून परळला दर दिवशी सकाळी ७, दुपारी १.३०, सायंकाळी ४ व ५ आणि रात्री ८ वाजता शिवशाही बसेस सुटतील, तर शिर्डीहून अंधेरीला जाण्यासाठी दुपारी ३.३० वाजता शिवशाही बस सोडण्यात येईल.

 

Web Title: Shivshahi instead of NimAram on Parel-Shirdi route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.