Join us

वीजचोरांना कारवाईचा ‘शॉक’, वर्षभरात २०० ग्राहकांविरोधात एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:26 AM

मुंबईच्या उपनगरात सातत्याने विजेची चोरी करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान २०१७-१८मध्ये ५८३ ग्राहकांविरोधात २०० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबईच्या उपनगरात सातत्याने विजेची चोरी करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान २०१७-१८मध्ये ५८३ ग्राहकांविरोधात २०० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यात ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २०१६-१७मध्ये ४११ ग्राहकांवर १२० वीजचोरीची प्रकरणे नोंदविण्यात आली होती. शिवाजीनगर, चित्ता कॅम्प, ट्रॉम्बे, मानखुर्द, जुहू लेन, मालवणीमध्ये वीजचोरीचे प्रमाण मोठे असून, अवैधरीत्या वीज व्यवसाय करणाºया गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वीजचोरी हा अजामीनपात्र गुन्हा आहे. वीज कायदा २००३, कलम १३५ अन्वये, गुन्हेगारास दंड, तीन वर्षांची पोलीस कोठडी किंवा गुन्हा सिद्ध झाल्यास दोन्ही शिक्षा एकत्रित देण्याची तरतूद आहे. असे असूनही विजेची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. यास आळा बसावा म्हणून रिलायन्स एनर्जीने वीजचोरांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेदरम्यान दक्षता विभाग पोलिसांच्या मदतीने सातत्याने छापे मारत आहे. यात अवैधरीत्या वितरण विजेच्या जाळ्यातून वायर टाकून वीजचोरी करणाºयांवर गुन्हा दाखल करत चोरी करण्यासाठी वापरत असलेली उपकणे जप्त करण्यात येत आहेत. २९०० वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये ५१ टन अवैध वायर्स जमा करण्यात आल्या असून, १४.६३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे २०० प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.या मोहिमेमुळे २०१७-१८मध्ये पारेषण आणि वितरण घट ८.१२ टक्क्यांनी कमी झाली असून, मागील वर्षी पारेषण आणि वितरण घट ८.८३ टक्के होती.>मकोका लागू : आॅगस्ट २०१७मध्ये, चेंबूर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याने प्रथमच वीजचोरी आणि विजेचे अवैध वाटप करणाºयांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला आहे. यांच्या विरोधात आधीच पोलीस ठाण्यात २४ प्रकरणे दाखल होती.रिलायन्स एनर्जीचे एकूण ३० लाख ग्राहक आहेत. त्यातील १/३ म्हणजे १० लाख ग्राहक झोपडपट्टीतील आहेत. उपनगरात ४०० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या ३० लाख ग्राहकांना रिलायन्स एनर्जीकडून वीजपुरवठा केला जातो.झोपडपट्ट्यांमध्ये विजेची मागणी जास्त आहे. जागेच्या अभावामुळे नवीन वीज वितरण जाळे टाकणे अशक्य आहे. वीजचोरीमुळे वितरण जाळ्यावर दाब आल्यामुळे देखरेख खर्च वाढतो. केबल्स आणि ट्रान्सफॉर्मर हे जास्त दाबामुळे बिघडतात. त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च वाढतो.विभाग परिसर ग्राहक संख्यापूर्व कुर्ला-मानखुर्द/विक्रोळी ३३३ ग्राहकांविरुद्ध६३ एफआयआर दाखलमध्य गोरेगाव-कांदिवली ८० ग्राहकांविरुद्ध४१ एफआयआर दाखलपश्चिम वांद्रे-विलेपार्ले ७५ ग्राहकांविरुद्ध४१ एफआयआर दाखलपश्चिम मध्य अंधेरी-जोगेश्वरी ८० ग्राहकांविरुद्ध४० एफआयआर दाखलउत्तर विभाग बोरीवली-भार्इंदर १८ ग्राहकांविरुद्ध१५ एफआयआर दाखल

टॅग्स :मुंबईवीज