Join us

सर्वपक्षीयांना जोर का झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2016 3:12 AM

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीसाठीचे प्रभागनिहाय आरक्षण सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात जाहीर झाले; आणि दिग्गज लोकप्रतिनिधींना धक्का बसला

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीसाठीचे प्रभागनिहाय आरक्षण सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात जाहीर झाले; आणि दिग्गज लोकप्रतिनिधींना धक्का बसला. विशेषत: प्रभागांची संख्या जैसे थे असली तरीही फेररचनेत तब्बल ८८ टक्के वॉर्डमध्ये बदल झाल्याने महापौरांपासून विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची अवस्था ‘जोर का झटका धीरेसे लगा...’ अशी झाली आहे. टीम लोकमत, मुंबईमुळातच लोकसंख्येत झालेल्या फेरबदलामुळे प्रभागनिहाय आरक्षण लागू झाल्याने ‘मातोश्री’पासून ‘वर्षा’वर फिल्डिंग लावून बसलेल्या दिग्गजांना ‘राज’कारणाचा हादरा बसला आहे. आता प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यामुळे संबंधित दावेदारांना स्फूर्ती चढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या रणधुमाळीत निवडणुकीचे तिकीट कोणाला मिळते; आणि ते मिळवण्यासाठी पक्षांतर्गत कशा कुरघोडी होतात; हेच यानिमित्ताने पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मुंबईतील बहुप्रतिक्षीत आरक्षणाची सोडत सोमवारी दुपारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात आली. या आरक्षणावेळी मुंबई शहरासह उपनगरातील नगरसेवक आणि त्यांच्या पाठीराख्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सगळ्याच नगरसेवकांसाठी हा दिवस महत्त्वाचा असल्याने या सोडतीवेळी प्रचंड धाकधूक आणि उत्सुकता अशा दोन्ही भावनांची सरमिसळ झाल्याचा प्रत्यय आला. मुंबई पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.कसे असेल आरक्षण हे सोबतच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ...यांची होणार अस्तित्वाची लढाई प्रभाग रचनेमध्ये बदल, मागासवर्ग व महिला आरक्षणामुळे महापौर स्नेहल आंबेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, सुधीर जाधव, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे (शिवसेना) भाजपाचे दिलीप पटेल या नगरसेवकांना फटका बसला आहे. कॉँग्रेसचे विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा व माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांचे प्रभाग पुनर्रचित झाल्याने बाजूच्या प्रभागामधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर महापौर स्नेहल आंबेकर यांनी माझा प्रभाग फेररचनेत विभागला गेल्याने बाजूला अनुसूचित जातीच्या प्रभागामधून निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढवू असे सांगितले आहे.पश्चिम उपनगरातील एच पूर्व (सांताक्रुझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील वॉर्डची संख्या एकने वाढली आहे. तसेच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन वॉर्ड वाढणार आहेत.अशी असेल नवी रचनाआरक्षण सोडत नव्या प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती (महिला) (एकूण ८ प्रभाग)२६, ५३, ९३, १२१, १४२, २००, २१०, २२५ अनुसूचित जाती (७ प्रभाग)१४६, १५२, १५५, १६९, १७३, १९५, १९८अनुसूचित जमाती (महिला)( १ प्रभाग) ५९अनुसूचित जमाती ( १ प्रभाग) ९९नागरिकांचा मागास वर्ग (एकूण ३० प्रभाग)५, ६, ९, १०, २८, ३३, ३१, ३८, ४०, ४५, ४८, ५५, ६२, ७२, ७६, ८१, ८९, ९१, १०४, १२९, १५३, १६१, १६२, १६३, १७५, १८६, १९३, २०६, २११, २१६नागरिकांचा मागास वर्ग (महिला) (एकूण ३१ प्रभाग) २१, २२, २७, ३२, ४२, ४६, ५२, ६५, ६७, ७८, ९०, १००, ११७, ११९, १२२, १२६, १३७, १४०, १४३, १४७, १५७, १५८, १७१, १८०, १८१, १८३, १९०, २१७, २१८, २२२, २२४सर्वसाधारण महिला (एकूण ७४ प्रभाग) १, ४, ७, १४, १६, १७, १९, २४, २५, ३०, ३४, ३५, ३६, ३७, ३९, ४४, ४७, ४९, ५४, ५६, ५७, ६१, ६३, ६४, ६६, ६९, ७०, ७४, ७५, ८३, ८६, ९२, ९४, १०२, १०५, १०७, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११६, १२०, १२३, १२४, १२५, १२८, १३०, १३४, १३५, १३६, १३८, १४४, १४८, १५६, १६७, १६८, १७४, १७७, १८७, १८८, १८९, १९१, १९२, १९९, २०१, २०२, २०३, २०७, २१२, २१९, २१५, २२३, २२६खुला (एकूण ७५ प्रभाग)२, ३, ८, ११, १२, १३, १५, १८, २०, २३, २९, ४१, ४३, ५०, ५१, ५८, ६०, ६८, ७१, ७३, ७७, ७९, ८०, ८२, ८४, ८५, ८७, ८८, ९५, ९६, ९७, ९८, १०१, १०३, १०६, १०८, ११४, ११५, ११८, १२७, १३१, १३२, १३३, १३९, १४१, १४५, १४९, १५०, १५१, १५४, १५९, १६०, १६४, १६५, १६६, १७०, १७२, १७६, १७८, १७९, १८२, १८४, १८५, १९४, १९६, १९७, २०४, २०५, २०८, २०९, २१३, २१४, २२०, २२१, २२७, सूचना व हरकतीबाबत.... आरक्षित प्रभाग किंवा प्रभागांची फेररचना याबाबत ५ ते २० आॅक्टोबरदरम्यान हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. ५ नोव्हेंबरला सूचना व हरकतीवर सुनवाई घेऊन १८ नोव्हेंबरला त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. २२ नोव्हेंबरला प्रभाग रचना, अधिसूचना व नकाशामधे योग्य ते बदल करून अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.