Join us

शरद पवार गटाला धक्का! नागालँडचे ७ आमदार अजित पवार गटासोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 5:58 PM

राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई- राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत  दोन गट पडल्याचे दिसत आहे. आता शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांच्या गटातील आमदारांवर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार यांच्या गटाला आणखी एक धक्का बसला आहे. नागालँड येथील ७ आमदारांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, या संदर्भात आज खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया

आज पत्रकार परिषदेत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी नागालँड येथील ७ आमदारांचे स्वागत केले. नागालँड येथील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यही यावेळी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, आम्ही नागालँड येथील सर्व आमदारांना आम्ही विनंती करत होतो. आता हे सर्व आमदार आमच्यासोबत आलेले आहेत.  

दुसरीकडे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. एकीकडे शरद पवार गटाने अजित पवार यांच्या गटातील  आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू केली आहे, तर आता नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.  महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये देखील शेड्युल १० अंतर्गत आमदारांवर कारवाईची  मागणी शरद पवार गटाने केल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसनागालँड